घटनाबाह्य मुख्यमंत्र्याच्या जाहिराती सामनाला चालतात तरी कशा? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यविधीमंडळाच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनात राज्यपालांच्या अभिभाषणावर उत्तर देतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटावर जोरदार हल्ला चढवला.;
राज्यविधीमंडळाच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनात राज्यपालांच्या अभिभाषणावर उत्तर देतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटावर जोरदार हल्ला चढवला.
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर घटनाबाह्य मुख्यमंत्री असल्याची टीका ठाकरे गटाकडून वारंवार केली जाते. त्यातच राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घटनाबाह्य मुख्यमंत्री असा उल्लेख केला. त्यावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, तुम्ही मला घटनाबाह्य मुख्यमंत्री म्हणता तर तुम्ही घटनाबाह्य विरोधी पक्षनेते आहात का? असा सवाल केला. त्याबरोबरच आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्याकडून माझा घटनाबाह्य मुख्यमंत्री म्हणता, पण सामनाला घटनाबाह्य मुख्यमंत्र्याच्या जाहिराती चालतात तरी कशा? असा सवाल एकनाथ शिंदे यांनी विचारला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या राज्यपालांच्या अभिभाषणावरील उत्तरात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार, ठाकरे गटाचे नेते यांना जोरदार कोपरखळ्या मारल्या. त्यामुळे सभागृहात हश्या पिकला होता.