हे नाचायला लागले सगळे, कसबा पोटनिवडणूकीवरून एकनाथ शिंदे यांचा टोला
कसबा पेठ (Kasaba peth bypoll) पोटनिवडणूकीत भाजपचा पराभव झाला. त्यावरून काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी (NCP) आणि ठाकरे गटाने (Thackeray group) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर निशाणा साधला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः कसबा पेठेत प्रचारासाठी गेले होते. मात्र त्यानंतरही तेथे भाजप उमेदवाराचा पराभव झाला. त्यावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, काँग्रेसचा उमेदवार कसब्यातून निवडूण आला. पण काँग्रेस तीन राज्यात भुईसपाट झाली. तर काँग्रेसचा उमेदवार निवडून आल्यानंतर ठाकरे गटाचे नेते, राष्ट्रवादीचे नेते जल्लोष करताना पहायला मिळाले. त्यावरून बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी टोला लगावला.;
कसबा पेठ (Kasaba peth bypoll) पोटनिवडणूकीत भाजपचा पराभव झाला. त्यावरून काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी (NCP) आणि ठाकरे गटाने (Thackeray group) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर निशाणा साधला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः कसबा पेठेत प्रचारासाठी गेले होते. मात्र त्यानंतरही तेथे भाजप उमेदवाराचा पराभव झाला. त्यावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, काँग्रेसचा उमेदवार कसब्यातून निवडूण आला. पण काँग्रेस तीन राज्यात भुईसपाट झाली. तर काँग्रेसचा उमेदवार निवडून आल्यानंतर ठाकरे गटाचे नेते, राष्ट्रवादीचे नेते जल्लोष करताना पहायला मिळाले. त्यावरून बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी टोला लगावला.