मागील काही दिवसांपासून एकनाथ खडसे हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, अशा चर्चांना उधान आले होतं, पण अखेर या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. भाजपमध्ये कधी पक्षप्रवेश करणार याविषयी एकनाथ खडसे यांनी स्वतःच माध्यमांशी बोलताना याविषयी खुलासा केला आहे. ते म्हणाले की, आगामी १५ दिवसांत मी भाजपमध्ये प्रवेश करणार असून वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत माझा पक्षप्रवेश सोहळा दिल्ली येथे होणार आहे.
शरद पवारांचे मानले आभार
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांचा मी कायमच ऋणी राहील. शरद पवारांनी आपल्याला संकटाच्या काळात अनमोल मदत केली असल्याने त्यांना विसरणे अशक्य आहे. परंतु मी माझ्या मुळ पक्षात असायला पाहीजे असी साद अनेक ज्येष्ट नेत्यांनी घातली होती, त्या अनुषंगाने मी विचारपूर्वक हा निर्णय घेतला आहे.
काय म्हणाले एकनाथ खडसे ?
एकनाथ खडसे यांनी काही दिवसांपूर्वी दिल्लीवारी केल्याची बातमी समोर आली होती. भाजपचे केंद्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची त्यांनी भेट घेतली. भाजपमध्ये प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. येत्या 15 दिवसांच्या आत हा प्रवेश व्हावा, अशा स्वरुपाचा त्यांचा प्रयत्न आहे. चंद्रपूरच्या सभेत वगैरे त्यांचा भाजप प्रवेश नाही. त्यांचा भाजपप्रवेश हा दिल्लीला होणार असून दिल्लीला केंद्रीय नेतृत्वाकडून त्यांना ज्यादिवशी बोलवणं येईल त्याच दिवशी त्यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडेल, अशी माहिती त्यांनी यावेळी बोलताना दिली.