मास्तरच्या मुलाची बाराशे कोटी मालमत्ताची चौकशी का होत नाही? एकनाथ खडसे यांचा रोख कोणाकडे

मास्तरच्या मुलाची बाराशे कोटी मालमत्ताची चौकशी का होत नाही? एकनाथ खडसे यांचा रोख कोणाकडे

Update: 2021-10-01 16:51 GMT

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर ईडीने अटक केल्याच्या चर्चेला उधाण आले असताना खडसे यांनी आता स्पष्टीकरण दिले आहे. आज एकनाथ खडसे यांनी जळगाव जिल्ह्यातील बोदवड येथे एका कापूस जिनिंगच्या कार्यक्रमात उपस्थित राहून कार्यकर्त्यांशी बोलताना मनातील खदखद पुन्हा बाहेर काढली.

आपला आता ईडीचा काहीही संबंध राहिला नसल्याचा दावा केला. ईडीच्या चौकशीच्या बाबत न्यायालयात खटला दाखल केला असल्याने न्यायालय अटक करत असेल किंवा काही करत असेल न्यायालय जो निर्णय देईल. त्यावर पुढे काय ते होईल. असं देखील खडसे यांनी यावेळी म्हटलं आहे.

आपल्याबद्दल अपप्रचार करणाऱ्या विरोधकांवर एकनाथ खडसे यांनी यावेळी जोरदार टीका केली.

माझं नाव खराब करण्यासाठी विरोधक जिवाचं रान करत असून नाथाभाऊ ची ताकद माहिती असल्याने विरोधक अशा प्रकारचे कृत्य करत असल्याचा दावा देखील एकनाथ खडसे यांनी यावेळी केला आहे.

माझ्या बाप जाद्यांनी करून ठेवले आहे. माझे स्वतःचे घर वाडे होते. त्याचे पुरावे आहेत. मात्र, ज्याचे वडील मास्तर होते. त्यांनी हजार बाराशे कोटी रुपयांची प्रॉपर्टी जमवली त्यांची चौकशी का होत नाही? असा सवाल करत एकनाथ खडसे यांनी नाव न घेता भाजप नेते गिरीश महाजन, मुक्ताईनगर चे शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला.

भाईचंद हिराचंद रायसोनी ( BHR) सोसायटीचा घोटाळा समोर आल्याने विरोधकांचे खरे दुखणे असून त्यामुळे विरोधक माझ्यावर आरोप-प्रत्यारोप करत असल्याचे एकनाथ खडसे यांनी म्हंटले आहे.

Tags:    

Similar News