EDची आणखी एक कारवाई, मोठ्या नेत्याचा जावई आणि एका अभिनेत्याची मालमत्ता जप्त

Update: 2021-07-03 04:07 GMT

राज्यात सध्या ED च्या कारवाईमुळे राजकारण तापले आहे. एकीकडे अनिल देशमुख यांच्यामागे EDचा ससेमिरा लागला आहे. तर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याही मागे ईडी लागते की काय असा सवाल उपस्थित केला जात आहे. या पार्श्वभूमीवर EDने आणखी एक मोठी कारवाई केली आहे.

संदेसरा समुहाच्या बँक घोटाळा प्रकरणी ईडीने अभिनेता डिनो मोरिया आणि काँग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल यांचे जावई इरफान अहमद सिद्दीकी यांच्यासह चौघांची सुमारे 9 कोटींची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. यामध्ये 8 स्थावर मालमत्ता, तीन वाहने, अनेक बँक खाती, शेअर म्युचुअल फंड या सुमारे 8.79 कोटींची संपत्ती जप्त केली आहे.



 

ईडीने दिलेल्या माहितीनुसार सिद्दीकी यांची 2.41 कोटींची संपत्ती, डिनो मोरिया यांची 1. 40 कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. तसेच संजय खान यांची तीन कोटी आणि अब्दुल खलील बचुअली यांच्या नावावर 1.98 रुपयांची संपत्ती जप्त झाली आहे. संदेसरा समुहाने आपला काळा पैसा या लोकांकडे वर्ग केल्याचे ईडीचे म्हणणे आहे. याप्रकरणी ईडीने आधी 14 हजार 513 कोटींची मालमत्ता जप्त केले आहे. आतापर्यंत याप्रकरणी ईडीने 4 जणांना अटक केली आहे. तर नितीन संदेसरा, चेतन संदेसरा, दीप्ती संदेसरा आणि हितेश पटेल यांना फरार घोषित करण्यात आले आहे.

Tags:    

Similar News