ED च्या निशाण्यावर माजी मंत्री Hasan Mushrif , मुश्रीफ यांच्या घरावर ईडीचा छापा

राष्ट्रवादीचे नेते तथा माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या घरावर ईडीने (Enforcement Directorate - ED ) छापेमारी केली आहे. कागलमधील त्यांच्या घरी ईडीची टीम दाखल झाली आहे. मुश्रीफ यांच्या घरी चौकशी करण्यात येत आहे. शिंदे सरकार (shinde fadnavis government) सत्तेत आल्यानंतर पहिली मोठी कारवाई करण्यात आली आहे. काही दिवसांआधी किरीट सोमय्या (kirit somaiya) यांनी ट्विटच्या माध्यमातून कारवाईचा इशारा दिला होता त्यानंतर आता ही मोठी कारवाई होत आहे.;

Update: 2023-01-11 04:43 GMT


राष्ट्रवादीचे नेते तथा माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या घरावर ईडीने (Enforcement Directorate - ED ) छापेमारी केली आहे. कागलमधील त्यांच्या घरी ईडीची टीम दाखल झाली आहे. मुश्रीफ यांच्या घरी चौकशी करण्यात येत आहे. शिंदे सरकार (shinde fadnavis government) सत्तेत आल्यानंतर पहिली मोठी कारवाई करण्यात आली आहे. काही दिवसांआधी किरीट सोमय्या (kirit somaiya) यांनी ट्विटच्या माध्यमातून कारवाईचा इशारा दिला होता त्यानंतर आता ही मोठी कारवाई होत आहे.

Full View

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांच्या घरावर आज बुधवारी सकाळी सक्तवसुली संचलनालय (ED) छापा टाकला. मुश्रीफ यांच्या कागल (Kagal-kolhapur)येथील निवासस्थानी हा छापा टाकण्यात आला आहे. अशी देखील माहिती समोर येत आहे की, ईडीच्या अधिकाऱ्यांसोबत प्राप्तीकर विभागाचे अधिकारी देखील आहेत. मुश्रीफ यांच्या घरी ईडीची टीम दाखल झाली आहे. काही दिवसांआधी किरीट सोमय्या यांनी ट्विटच्या माध्यमातून गडहिंग्लज येथील आप्पासाहेब नलावडे साखर कारखान्यातील (appasaheb nalawade sugar factory) १०० कोटीच्या आर्थिक गैरव्यवहाराबाबत कारवाईचा इशारा दिला होता. त्यानंतर आता ही मोठी कारवाई होत आहे. ईडीचे जवळपास २० अधिकारी आज सकाळी सहाच्या सुमारास हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील निवासस्थानी पोहोचले.

काय आहे प्रकरण? मुश्रीफ आणि त्यांचा जावई यांनी मिळून हा १०० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप...

अप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज सहकारी साखर कारखाना अवसायनात काढण्यात आला. तेव्हा तो ज्या कंपनीला विकण्यात आला ती बिस्क इंडिया (brisk india pvt ltd) ही कंपनी आहे. या कंपनीचा प्रमुख मालक हे मतीन मंगोली (Matin Mangol) हे आहेत. ते हसन मुश्रीफ यांचे जावई आहेत. या कंपनीतही कोलकाता (Kolkata) येथील बंद पडलेल्या कंपन्यांच्या नावाने बोगस खाती तयार करण्यात आली असल्याचा आरोप हसन मुश्रीफ यांच्यावर आहे.

इतकाच नाही तर बिस्क इंडिया कंपनीला साखर कारखाना चालवण्याचा कोणताही अनुभव नसताना त्यांना ती कंपनी दिली यासाठी कोल्हापूर जिल्हा सहकारी बँकेने (KDCC Bank) योग्य लिलाव केला नसल्याचा सुद्धा आरोप आहे. मुश्रीफ आणि त्यांचा जावई यांनी मिळून हा १०० कोटींचा घोटाळा आहे असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता..

Tags:    

Similar News