जयंत पाटील यांना ED ची नोटीस | ED Issued Notice to Jayant Patil

आज सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर निकाल येणार आहे. याकडे सगळ्या राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आह. अशा परिस्थितीतच आणखी एक मोठी घटना समोर आली आहे;

Update: 2023-05-11 03:43 GMT

आज सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर निकाल येणार आहे. याकडे सगळ्या राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आह. अशा परिस्थितीतच आणखी एक मोठी घटना समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडी कडून नोटीस बजावण्यात आलीय. त्यामुळं चर्चांना ऊत आलाय. जयंत पाटील यांना शुक्रवार (12 मे) चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात हजर राहण्याचे आदेश नोटीसमधून देण्यात आले आहेत.

IL & FS या कंपनीच्या व्यवहाराची चौकशी ईडीमार्फत सुरू होती. यासंदर्भातच जयंत पाटील यांची चौकशी होणार आहे. मात्र, अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारची नोटीस मिळाली नसल्याचं जयंत पाटील यांनी सांगितलंय. (ED Issued Notice to Nationalist Congress Party State president Jayant Patil)

ईडीमार्फत IL & FS या कंपनीच्या व्यवहाराची चौकशी आधीपासूनच सुरू झालेली आहे. या कंपनीनं आर्थिक दिवाळखोरी जाहीर केली होती. IL & FS या कंपनीच्या माध्यमातून मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप कंपनीवर आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनाही याच IL & FS कंपनीच्या गैरव्यवहार प्रकरणी नोटीस पाठवण्यात आली होती.

या कंपनीच्या आर्थिक व्यवहारात मोठ्या प्रमाणावर अनियमितता होती. मनी लॉँड्रिंग झाल्याची शंका आल्यानं पोलिसांनी याप्रकऱणी गुन्हा दाखल करत अरूणकुमार साहा यांची चौकशी केली होती. या चौकशीनंतर समोर आलेल्या नावांमध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा समावेश होता.

Tags:    

Similar News