राज्यात EDच्या कारवाईचा धडाका सुरुच आहे. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना ED ने धक्का दिला आहे. ED ने मंगळवारी रात्री उशिरा खडसे यांचे जाव्ई गिरीश चौधरी यांना अटक केली आहे. पुण्यातील भोसरी येथील जमीन खरेदी प्रकरणी ED ने गिरीश चौधरी यांना मंगळवारी चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. त्यांची दिवसभर चौकशी केल्यानंतर ईडीने त्यांना. अटक केली.
भोसरी येथील जमीन खरेदी प्रकरणाच्या वादामुळे खडसे यांना आपल्या मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. भाजपमधुन राजीनामा देऊन एकनाथ खडसे यांनी काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. आपण राष्ट्रवादी काँग्रेसचमध्ये प्रवेश केल्यामुळे आपल्या मागे ईडी लावण्यात आली, असा आरोप खडसे यांनी आधीच केला आहे. भोसरी जमीन खरेदी प्रकरणी एकनाथ खडसे यांचीही चौकशी करण्यात आली आहे. आता या प्रकरणात नाव असलेल्या इतरांवरही ईडी काय कारवाई करते ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.