#गावगाड्याचे_इलेक्शन – निवडून आलेल्या सदस्यांनी सगळ्यात आधी काय केले पाहिजे?
ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल लागले आहेत. सध्या विजयाचा जल्लोष सुरू आहे. पण या जल्लोषात नवनिर्वाचित सदस्य काही गोष्टींकडे दुर्लक्ष करतात आणि त्याचे दुष्परिणाम त्यांच्यासह गावाला भोगावे लागतात. त्यामुळे नवीन सदस्यांनी काय खबरदारी घ्यावी हे सांगणारा हा व्हिडिओ नक्का पाहा...
निवडणुकांचे निकाल आल्यावर विजयी उमेदवार जल्लोषात मग्न होतात. पण यापेक्षाही महत्वाची गोष्ट या विजयी उमेदवारांनी केल्यास ते खऱ्या अर्थानं त्याच्या पदाला न्याय देऊ शकतील. निवडून आल्याचं प्रमाणपत्र मिळण्यास सहा महिन्यांचा कालावधी लोटतो.
त्यामुळं विजयी उमेदवारानं हे प्रमाणपत्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे तात्काळ मागितलं पाहिजे. यंत्रणा समजून घेण्याकरता ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसोबत परिचय, ग्रामपंचायत दप्तराची माहिती करून घेतली पाहिजे. लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना काही विशेष अधिकार आहेत.
त्या अधिकारांची माहिती घेऊन त्यांचा योग्य वापर लोकप्रतिनिधी केला नाही, तर गावकारभार करताना अडचणी येतील. शिवाय त्यांच्या अधिकारांचा गैरवापर ग्रामसेवक किंवा इतर लोक करू शकतात. आरोप मात्र लोकप्रतिनिधीवर येऊ शकतो. महिला सरपंच आणि सदस्यांकरता तर या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. कारण अजूनही त्यांच्यावर रबर स्टॅंप असल्याचा आरोप होत असतो. या सर्व गोष्टी कशा टाळाव्यात, आपले हक्क आणि अधिकार कोणते, ते कसे वापरावेत याबद्दल ग्रामपंचायत लोकप्रतिनिधी म्हणून 20 वर्ष काम करणाऱ्या रत्नमाला वैद्य यांच्याकडून जाणून घेतले. रत्नमाला वैद्य महिलांना आरक्षण मिळालं तेव्हापासून ग्रामपंचायत सदस्या म्हणून कार्यरत आहेत.