आई-बापाच्या बाबतीत नाद करायचा नाही – सुप्रिया सुळेंनी खडसावलं

Update: 2023-07-05 12:16 GMT

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडानंतर शरद पवारांनी आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान इथं पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी आक्रमक आणि काहीसं भावनिक भाषण केलं. बापाच्या आणि आईच्या बाबतीत नाद करायचा नाय बाकी कुणाबद्दलही बोला, आमच्याबद्दल बोला पण बापाचा नाद नाही करायचा बाकी काहीही ऐकून घेऊन, असा इशाराच सुप्रिया सुळे यांनी यावेळी शरद पवारांवर टीका करणाऱ्यांना दिला.

सुप्रिया सुळेंनी भाषणाची सुरूवातच कवी दासू वैद्य यांच्या कवितेनं केली. पंधरा वर्षापूर्वी जेव्हा सुप्रिया सुळे स्त्रीभ्रूण हत्येविरोधात लढत होत्या, त्यावेळी दासू वैद्य यांनी लिहिलेली कविताच यावेळी सुप्रिया सुळेंनी वाचली. “श्रमलेल्या बापासाठी श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी लढणाऱ्या लेकीसाठी माझा बाप माझी बुलंद कहाणी” या ओळी म्हटल्यानंतर सभागृहातलं वातावरण थोडसं भावनिक झालं होतं. यावरूनच सुप्रिया सुळेंनी शरद पवारांवर टीका करणाऱ्यांना खडे बोल सुनावले. त्या म्हणाल्या, “ एकच सांगते बापाच्या आणि आईच्या बाबतीत नाद करायचा नाय बाकी कुणाबद्दलही बोला, आमच्यावर करा काहीही करा पण बापाचा नाद नाही करायचा बाकी काही ऐकून घेऊ काहीही ऐकून घेऊ. एक सांगते मी महिला आहे, छोटंसं बोलला ना तर टचकन डोळ्यात पाणी येतं पण जेव्हा संघर्षाची वेळ येते तेव्हा पदर खोचून तीच अहिल्या होते तीच ताराराणी होते आणि तीच जिजाऊ होते आणि यावर हा निर्णय आणि जबाबदारी आज आपल्या सगळ्यांवर आली असल्याचं सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या.

“ही लढाई ही लढाई एका व्यक्तीच्या विरोधात नाही. भारतीय जनता पक्षाच्या प्रवृत्ती विरोधात आपल्याला लढायचं आहे. ही ती लढाई आहे. मला अजून ते शब्द आठवताहेत. मला तेव्हा वेदना होत्या. चार-पाच वर्षांपूर्वी अजून मन थोडंसं हळू होतं. आता जरा घट्ट झालंय. त्याच्यामुळे ज्यांनी घट्ट केलंय त्यांचे मनापासून आभार मानते, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

एनसीपी ला काय म्हणायचे नॅचरली करप्नट पार्टी... ना खाऊंगा ना खाने दूंगा, लेकिन जब मुझे जरुरत पडेगी वही एनसीपी को खा जाऊंगा. त्यामुळे माझा आज आरोप आहे, भारतीय जनता या देशामध्ये सगळ्यात भ्रष्ट पक्ष आहे, असा आरोपही सुळे यांनी यावेळी केला. प्रधानमंत्र्यांनी सत्तर हजार कोटी रुपयांचा घोटाळा, बँकेचा घोटाळा आणि कुठला घोटाळा ते झालं एक आठवड्यात हे झालं मला कोणीतरी विचारलं की राष्ट्रवादी काँग्रेस का ICE हो गया म्हटलं आईस हो गया मतलब क्या होगया आईस म्हणजे I म्हणजे इनकम टॅक्स C म्हणजे सीबीआय हे मी म्हणत नाही हे ते TV वाले आणि वर्तमानपत्रवाले म्हणतात, अशी मिश्किल टीकाही सुप्रिया सुळेंनी यावेळी केली.

माझ्या वाचनात आणि ऐकण्यात आता आलं. की काही लोकांचं म्हणणं आहे की काही लोकांचं वय झालंय. त्याच्यामुळे त्यांनी फक्त आशीर्वाद द्यावे. रतन टाटा पवार साहेबांपेक्षा तीन वर्षांनी मोठे आहेत. आजही समूह पोटतिडकीने लढतात आणि सगळ्यात मोठा कुठला समूह आहे देशात तर तो टाटा समूह आहे. रतन टाटांचं वय ८६ वर्षे आहे. कोरोनाची लस बनविणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूटचे सायरस पुनावाला त्यांचं वय ८४ वर्षे म्हणजे पवार साहेबांच्या आणि खासदार श्रीनिवास पाटील काकांच्या वयाचे आहेत ते. अमिताभ बच्चन यांचं वय आहे 82 वर्षे त्यामुळं वय हा म्हणजे फक्त आकडे यापेक्षा जास्त काही नाही. जम्मू-काश्मिरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला हे शरद पवार यांच्यापेक्षा तीन वर्षांनी मोठे, त्यांनीही मला फोन करून इथल्या राजकीय परिस्थितीबद्दल विचारणा केली. ते म्हणाले, की पिताजी को बोलिये, मै भी संघर्ष कर रहा हूँ, वो भी संघर्ष करें अशी आठवणही सुप्रिया सुळे यांनी यावेळी सांगितली.

घरामध्ये जेव्हा अडचण निर्माण होते, तेव्हा लेक उभी राहते वडिलांबरोबर, असं सांगत सुप्रिया सुळेंनी पक्षावर आलेल्या या कठीण परिस्थिती पक्षाच्या आणि शरद पवारांच्या पाठिशी खंबीरपणे उभं असल्याचं सांगितलं. त्या पुढे म्हणाल्या, “या सगळ्या या परिस्थितीमध्ये हलून जायचं नाही. अरे पक्ष बांधू आमदार आहेत आनंद आहे. जे गेलेत त्यांना शुभेच्छा आहेत. कारण 2019 मी विसरलेले नाही ते विसरले असतील. त्यावेळचे सगळे सर्वे मी पाहिले होते. 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला या सर्वेमधून फक्त ११ जागा जिंकण्याचा अंदाज वर्तवला होता. हाच 80 वर्षाचा योद्धा लढला आणि या देशाचा जेव्हा जेव्हा इतिहास लिहिला जाईल तो पावसात भिजून भाषण केलेला फोटो हा देशाच्या प्रत्येक इतिहासात, राजकारणात लिहिला जाईल असंही यावेळी त्या म्हणाल्या.

शपथविधीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी शरद पवारांना विचारलं की राष्ट्रवादीचा आश्वासक चेहरा कोण, त्यावर मी असं उत्तर दिलेल्या शरद पवारांचा फोटो त्यांच्याही बॅनरवर आहे. आता ठीक आहे, या सगळ्या गोष्टी होत राहतील, त्याबद्दल काही बोलायचं नाही, असं सांगत अजित पवारांच्या समर्थनार्थ लावण्यात आलेल्या बॅनरमध्ये शरद पवारांचा फोटो वापरण्यात आला आहे, त्याला सुप्रिया सुळेंनी भाषणातून प्रत्युत्तर दिलंय.

पक्षात बंडखोरी करणाऱ्यांचाही सुप्रिया सुळे यांनी समाचार घेतला. तुमचं नशीब तुम्हाला लखलाभ. पण आज पासून संपूर्ण महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाच्या खोटारडेपणासाठी लढायचं, असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. यावेळी पंतप्रधान मोदींवरही सुप्रिया सुळेंनी टीका केली. मोदी म्हणतात, ना खाऊंगा ना खाने दूंगा, अब दिखाऊंगी. कैसे तुमने खाया हा माझा महाराष्ट्र आहे, आपला महाराष्ट्र आहे. आपल्याला पूर्ण ताकदीने आता यांच्या विरोधात लढायचं आहे. आणि भारतीय जनता पक्षानी काय दिलं ? द्वेष पसरवला. तुमच्या आयुष्यात नऊ वर्षात काय झालं ? गॅस सिलेंडरचा भाव सांगा, असे प्रश्न विचारत सुप्रिया सुळेंनी उपस्थितांच्या भावनेलाच हात घातला.

सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे पूर्ण ताकतीने रस्त्यावर उतरा, भारतीय जनता पक्षाच्या विरोधात बोलत आलो आहोत पुढेही बोलत राहू त्यांचा जो काय कार्यक्रम करायचा आहे दिल्लीत तो मी अमोल कोल्हे आणि खासदार फैजल मिळून करू असंही त्या यावेळी म्हणाल्या. खोट्या केसेस करूनही अनिल देशमुख, फैजल यांच्यासारखे नेते आपल्या सोबत असल्याचं त्या म्हणाल्या. जर हे लोक एकटे लढू शकतात तर मग आपल्याला काय अडचण आहे लढायला, असा प्रश्नही सुप्रिया सुळेंनी यावेळी उपस्थित केला. सत्ता येते जाते हो सत्तेने सुख मिळत नाही. असं तुम्हाला वाटत असेल ना? तर हा भ्रम असल्याचं सांगत बंडखोरी करणाऱ्यांवर टीका केली. पक्ष आता नव्या उमेदीनं सुरू होणार असल्यानं महिलांनाही आपण ३३ टक्के आरक्षण देण्याची मागणीच सुप्रिया सुळे यांनी यावेळी केली. भविष्यातही महाराष्ट्रातील जनता शरद पवारांच्याच मागे उभी राहील. पूर्ण जिद्दीनं लढू आणि पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचा ओरिजनला झेंडा आणि चिन्ह आपल्याकडेच राहील, त्याची चिंता करू नका, कारण राष्ट्रवादी काँग्रेसचा एकच शिक्का आहे आणि त्या शिक्क्याचं नाव आहे शरद पवार, असं सांगितल्यावर सभागृहातील उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात दादही दिली

Tags:    

Similar News