साताऱ्यातील शिवराज पेट्रोल पंपा नजीक असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नूतन जागेवरील नियोजित भूमिपूजन समारंभ खा.उदयनराजे भोसले यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत उधळून लावला आहे. आज आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते या जागेचा भूमिपूजन होणार होता. मात्र भूमिपुजनापूर्वीच खासदार उदयनराजे भोसले हे अचानक या ठिकाणी कार्यकर्त्यांसमवेत दाखल झाले. त्यांनी हा भूमिपूजन कार्यक्रम उधळून लावला आहे. या ठिकाणी असलेलं साहित्य फेकून देत तेथे असलेला कंटेनर देखील पलटी केला.
या घटनेमुळे साताऱ्यातील दोन्ही राजेंमध्ये असलेला वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. यामुळे साताऱ्यात तणावाची शक्यता निर्माण झाली आहे…