पवार आणि आंबेडकरांच्या भेटीची चर्चा

Update: 2023-10-22 09:47 GMT

Mumbai : राष्ट्रवादी कॉग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि वंचित बहुजन आघाडीचे(VBA) प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash ambedkar) यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. भाजप विरोधी गटात अर्थात इंडिया आघाडी (INDIA) गटात प्रकाश आंबेडकर सहभागी होतील का अशी शक्यता वर्तवली जात आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रॉब्लेम्स ऑफ रुपी प्रबांधला १०० वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने वाय बी चव्हाण सेन्टर (YB Center)येथे भेट झाली. या कार्यक्रमानंतर सुप्रिया सुळे (Supriya Sule)यांनी प्रकाश आंबेडकर यांना भेटीसाठी निमंत्रण दिले. शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांची बंद दरवाजा आड झालेली कॉफी वर चर्चा राज्याच्या राजकारणात वेगळाच रंग घोळत आहे.

शरद पवार यांच्या भेटीनंतर प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी सवांद साधला. यावेळी आंबेडकर म्हणाले की,आयोजकांनी चांगला कार्यक्रम घेतला, प्रॉब्लेम्स ऑफ रुपी प्रबांधला १०० वर्षे पूर्ण झाली. कार्यक्रमासाठी मला निमंत्रण दिलं होतं. त्यामुळे मी आलो. कार्यक्रमानंतर सुप्रिया सुळे यांनी कॉफी साठी बोलावलं. शरद पवार देखील उपस्थित होते. आम्ही जवळपास १२ लोक होतो. मात्र या भेटीत इंडिया आघाडीच्या प्रवेशा संदर्भात आमच्यात कुठलीही चर्चा झाली नसल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले. माझा कायम भाजपाला विरोध आहे. शिवाय पाच राज्याच्या होत असलेलया निवडणुकी पर्यंत काही होणार नसलयाचे देखील त्यांनी सांगितले.

पवार आणि आंबेडकर यांच्या भेटीबाबत अशोक चव्हाण (Ashok Chavan)यांनी सकारात्मक भूमिका मांडली आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर आणि महाविकास आघाडीने आगामी निवडणुकीमध्ये एकत्र आले पाहिजे. आज कॉफी निमित्त औपचारिक भेट झाली असली तरी, येत्या काळात महाविकास आघाडी (MVA) सोबत घेण्याच्या दृष्टीने योग्य ती सकारात्मक पावले पडवीत. अशी इच्छा अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेआध्यक्ष (Congress) नाना पटोले (Nana Patole)यांनी या भेटीचे शुभ संकेत मानले आहेत. महाविकास आघाडीची बैठकीत यावर चर्चा होईल. आंबेडकर यांनी चर्चेला सकारात्मक प्रतिसाद दिला तर महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र येवून एकत्र निवडणूक लढावी अशी अपेक्षा असल्याचे पटोले यांनी सांगितले.

Tags:    

Similar News