माविआचे नेते कितीवेळा असं आंदोलन करणार आहेत? मी आजच डर्डी डझनची यादी जाहीर केली. त्यांच्यावर आधीच तपास आणि कारवाई सुरू आहे. या डर्टी डझनमध्ये अनिल देशमुख, नवाब मलिक या दोघांबाबत निर्णय आला. त्यात अनिल परब आहेत आणि त्यांच्यावर आधीच प्रक्रिया सुरू झालीय. बेनामी रिसॉर्टमध्ये कायदेशीर कारवाई सुरू झालीय." अशी टिका भाजप नेते किरीट सोमय्यांनी केली आहे.
डर्टी डजनमधे १. अनिल देशमुख, २. नवाब मलिक, ३. अनिल परब, ४. संजय राऊत , ५. सुजित पाटकर, ६. भावना गवळी, ७. आनंद आडसुळ,८. अजित पवार ९. हसन मुश्रीफ,१०. प्रताप सरनाईक,११. रविंद्र वायकर आणि १२. जितेंद्र आव्हाड यांचा समावेश आहे.