खासदार डिंपल यादवचं मोठं विधान; राममंदिर उभारणी ठिक आहे परंतु...
डिंपल यालव यांनी म्हटलं आहे की, लोकसभेच्या निवडणूका लवकरच होतील. वेळ खूप कमी आहे त्यामूळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचणं हा माझा उद्देश आहे. आयोध्येतील प्राणप्रतिष्ठेच्या प्रश्नावर म्हणाल्या की, येणाऱ्या काळात परीवारासह आयोध्याला जाईल. मंदिर कार्य पूर्ण न झाल्यामूळे शंकराचार्य प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमाला विरोध करत आहेत. शास्ञानुसार मंदिर कार्य पूर्ण झाल्यावरच प्राणप्रतिष्ठा व्हायला हवी.
ननपूरी: शनिवारी दन्नाहार परीसरातील नगला धारा येथे एका खाजगी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आलेल्या समाज पार्टीच्या डिंपल यादव यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर हल्ला चढवला. त्यांना प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचं निमंञण न मिळाल्याबाबत त्या बोलल्या.
डिंपल बोलल्या, निवडणूका तोंडावर आहेत, वेळ कमी आहे.
खासदार म्हणाल्या की, लोकसभेच्या निवडणूका तोंडावर आहेत, लोकसभेच्या निवडणूका लवकरच होतील. वेळ खूप कमी आहे त्यामूळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचणं हा माझा उद्देश आहे. आयोध्येतील प्राणप्रतिष्ठेच्या प्रश्नावर म्हणाल्या की, येणाऱ्या काळात सहकुटूंब सहपरीवार आयोध्याला जाईल. मंदिर कार्य पूर्ण न झाल्यामूळे शंकराचार्य प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमाला विरोध करत आहेत. शास्ञानुसार मंदिर कार्य पूर्ण झाल्यावरच प्राणप्रतिष्ठा व्हायला हवी.
इथले तरुण बेरोजगार आहेत.
धर्माचा वापर हा राजकारणासाठी झाला नाही पाहिजे. त्या म्हणाल्या की, राम मंदिराचं निर्माण होणं चांगली गोष्ट आहे परंतु; आजही इथल्या लोकांच्या समस्या संपल्या नाहीत. सरकारने त्यावर काम करण्याची आवश्यकता आहे.
आमचे तरुण बेरोजगार आहेत, त्यांच्या भविष्याची कसलीच शाश्वती नाही. शिक्षणाशिवाय कुठलाही समाज पुढे जाऊ शकत नाही. सरकार लोकांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करीत नाही. शासनाने समाज विकासासाठी शिक्षण आणि आरोग्य सुविधा यांची गावोगावी जनजीगृती करायला पाहिजे.