माजी मुख्यमंत्र्यांना एक वर्षाची शिक्षा...

माजी मुख्यमंत्र्यांना न्यायालयाने एक वर्षाची शिक्षा सुनावली आहे. पण नेमके हे प्रकरण काय आहे?

Update: 2022-03-27 06:29 GMT

या शिक्षेवर प्रतिक्रिया देताना दिग्विजय सिंह म्हणाले, 'हे संपूर्ण प्रकरण खोट्या गोष्टीवर आधारित आहे. याचा पायाच खोट्या गोष्टीवर आधारीत आहे. या आम्ही विरोधत अपील करणार आहोत.

या प्रकरणाच्या सुनावणीसाठी दिग्विजय सिंह शनिवारी इंदौरला आले होते. न्यायाधीश मुकेश नाथ यांनी या प्रकरणात आपला निर्णय दिला.

काय आहे प्रकरण?

17 जुलै 2011 ला भारतीय जनता युवा मोर्चाचे कार्यकर्ते उज्जैनमध्ये दिग्विजय सिंह यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात पोहोचले होते. त्यांनी कार्यक्रमाला विरोध केला. यावेळी मोठा गदारोळ झाला होता. दिग्विजय सिंह यांना या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवण्यात आले होते.

काँग्रेसजच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना विरोध केला होता. दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये झालेल्या वादात अनेक लोक जखमी झाले होते. त्यानंतर दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते.

जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश श्रीनाथ यांनी शनिवारी सायंकाळी दिलेल्या निकालात माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह, माजी काँग्रेस खासदार प्रेमचंद गुड्डू, दिलीप चौधरी, जयसिंग दरबार, अस्लम लाला आणि अनंत नारायण मीणा यांना प्रत्येकी एक वर्ष आणि पाच वर्षांची शिक्षा सुनावली. दोषींना न्यायालयाने ५ हजार रुपयांचा दंड देखील ठोठावला. तसंच इतर तीन आरोपींची पुराव्याअभावी न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.

कोर्टाने संध्याकाळी उशिरा सर्व दोषींना प्रत्येकी 25 हजार रुपयांच्या जामिनावर जामीन मंजूर केला.

17 जुलै 2011 रोजी उज्जैन येथे घडलेल्या या घटनेत BJYM नेते अमय आपटे गंभीर जखमी झाले होते. BJYM नेत्यावर खुनी हल्ल्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा काँग्रेस कार्यकर्त्यांवर दाखल करण्यात आला होता. या हल्ल्यात दिग्विजय सिंह यांचाही हात असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यामध्ये त्यांना 1 वर्षाची शिक्षा सुनावली आहे.

Tags:    

Similar News