DHULE | मोदीजींनी वॅक्सीन दिलं नसतं तर विरोधक बोलले कसं असते चित्रा वाघ यांचा विरोधकांना टोला
धुळे ः केंद्र सरकारच्या माध्यमातून महिलांच्या उन्नतीसाठी विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येत आहेत. या सर्व योजना ग्रामपातळीवर पोहोचविण्यासाठी महिला मोर्चा प्रयत्नशील असतो. ग्रामीण विकासातूनच पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भारत विकासाचे स्वप्न पूर्ण होईल यासाठी सर्वांनी हातभार लावण्याची आवश्यकता आहे, कोरोना काळात मोदीजींचे वॅक्सीन घेतले नसते तर विरोधक बोलले कसे असते असा टोला भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी धुळ्यातील एका कार्यक्रमात लगावला आहे.
भारतीय जनता पक्षाचा ग्रामीण महिला मोर्चाचा मेळावा बोरीस येथे झाला त्यावेळी भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ बोलत होत्या. त्या म्हणाल्या की " देवेंद्र फडणवीसजी सांगत होते की विरोधक आपलं काम हलकं करत आहेत, विरोधकांनीही मोदीजींचे आभार मानले पाहीजेत. कोरोना काळात मोदीजींचे वॅक्सीन घेतले नसते तर विरोधक बोलले कसे असते असा टोला चित्रा वाघ यांनी विरोधकांना लगावला आहे.
दरम्यान या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा परिषद अध्यक्ष धरती देवरे यांनी केले होते. खासदार डॉ. सुभाष भामरे, जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, महिला मोर्चा विभागीय प्रदेश समन्वयक जयश्री अहिरराव, मनीषा खलाणे, टी बचावच्या अल्पा अग्रवाल, चंद्रकला सिसोदिया, जिल्हा परिषद सदस्या अभिलाशा पाटील, सखुबाई पारधी, प्रा. वैशाली पाटील आदी उपस्थित होत्या.