फडणवीस राज्यसभेवर जाणार, राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याचा दावा

देवेंद्र फडणवीस मोदी सरकारमध्ये मंत्री होणार...

Update: 2021-04-05 07:42 GMT

कोल्हापुरच्या दोन नेत्यांचं वाकयुद्ध संपण्याचं नाव घेत नाही. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यामध्ये सध्या चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. या कलगीतुऱ्यात फडणवीसांबाबत मोठी बातमी समोर आली आहे.


 शरद पवार यांच्या आजारपणाबद्दल भाजपचे मीडिया सेल प्रमुख नवीन जिंदाल यांनी


सचिन वाझेने राष्ट्रीय तपास यंत्रणेला असं काय सांगितलं की, शरद पवार यांच्या पोटात इतक्या जोरात दुखायला लागले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली. आता तर वाटते की, 'दाल मे कुछ काला नही, पुरी दालही काली है', शरद पवार यांची ही पोटदुखी पाहता, पश्चिम बंगालच्या आधी महाराष्ट्रातच सत्तांतर होईल. असं ट्वीट नवीन कुमार जिंदाल यांनी केलं होतं.





शरद पवार यांच्याबाबत नवीन जिंदाल यांनी केलेल्या टीकेनंतर हसन मुश्रीफ यांनी भाजपनं माफी मागावी अशी मागणी केली होती. या मागणीनंतर चंद्रकांत दादा पाटील यांनी या मागणीवर हसन मुश्रीफ यांनाच सुनावलं…


दुसऱ्या जागी जाऊन निवडून यायला धमक लागते. हसन मुश्रीफ यांनी जिल्ह्यातील दुसऱ्या एखाद्या मतदारसंघात जाऊन निवडून येऊन दाखवावे. कागल मतदारसंघामध्ये मतांची विभागणी करून निवडून येणे काही विशेष नाही. पण, मला आता ते सर्व खुलेपणाने सांगायचे नाही. मुश्रीफ हे माझे जवळचे मित्र आहेत. तुम्हाला काही तब्येतीचा परिणाम झाला आहे का? महाराष्ट्र्रात कोणीही काही बोलले तरीही कोण बोलत नाही. मला आश्चर्य वाटत आहे की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल मी वर्षभर इतके बोललो तरीही ते काहीही आतापर्यंत बोलले नाहीत. पण, पहिली प्रतिक्रिया ही मुश्रीफ यांची असते. यांना एजंट म्हणून ठेवलंय की काय? असा सवाल करत मुश्रीफ यांना उत्तर दिलं होतं.




मी आमचा पक्षाचा एजंट:

हसन मुश्रीफ

आज माध्यमांशी बोलताना हसन मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटील यांच्या टिकेला उत्तर दिले….

'शरद पवार यांच्याबद्दल जिंदाल यांनी केलेल्या विधानावर भाजपनं माफी मागावी एवढंच मी म्हटलं होतं. चंद्रकांत पाटलांना चोमडेपणा करायला कुणी सांगितला होता? मी आमच्या पक्षाचा एजंट आहे, पवार साहेबांवर टीका केल्यानंतर गप्प बसू का?,'

एवढंच मी म्हटलं होतं. असा सवाल करत हसन मुश्रीफ यांनी केला.



फडणवीस राज्यसभेवर…



'पाच वेळा विधानसभा निवडणुकीत निवडून आलो आहे. अनेक वर्षे मंत्रिपद भूषवलं आहे. हाडाची काडं आणि रक्ताचं पाणी करून जीवाला जीव देणारी माणसं तयार करावी लागतात. चंद्रकांत पाटलांना आयत्या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची सवयच आहे. भविष्यात देवेंद्र फडणवीस यांना राज्यसभेत पाठवलं जाणार आहे. नागपूरमध्ये नितीन गडकरी असल्यानं त्यांना लोकसभा निवडणूक लढण्याची संधी मिळणार नाही. पण राज्यसभेत पाठवून त्यांना मंत्रिपद दिलं जाणार आहे. त्यांच्या जागी चंद्रकांत पाटील हे नागपुरातून निवडणूक लढणार आहेत, अशी चर्चा असल्याचा गौप्यस्फोट हसन मुश्रीफ यांनी केला आहे.



Tags:    

Similar News