राज्यसभा निवडणूकीतील घोडेबाजारावरून संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला देवेंद्र फडणवीस यांचे प्रत्युत्तर

राज्यात राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी अटीतटीची लढत होण्याची शक्यता आहे. त्यातच भाजपने आपला उमेदवार मागे घ्यावा, यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मात्र त्यानंतर भाजपने आपला उमेदवार मागे न घेतल्याने या निवडणूकीत घोडेबाजार होणार असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. त्याला देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले.;

Update: 2022-06-04 04:49 GMT

राज्यसभेची सहावी जागा बिनविरोध न झाल्यामुळे या निवडणूकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर यामध्ये कोल्हापुरचे संजय पवार आणि धनंजय महाडिक यांच्यात हा सामना रंगणार आहे. मात्र उमेदवारी मागे घेण्याची विनंती करण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी गेले होते. त्यावेळी झालेल्या चर्चेत तोडगा न निघाल्यामुळे भाजपने आपला उमेदवार कायम ठेवला. त्यामुळे राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठीची लढत रंगतदार होणार आहे. त्यावरून संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली होती. त्याला देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले. ते पनवेल येथे पत्रकारांशी बोलत होते.

यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आम्ही राज्यसभेची तिसरी जागा लढत आहोत. आमच्याकडे संख्याबळ आहे. तसेच आम्हाला आमच्या आमदारांच्या सद्सद्विवेक बुध्दीवर विश्वास आहे. त्यामुळे आम्हाला तिसरी जागा जिंकण्याचा विश्वास आहे.

संजय राऊत यांनी या निवडणूकीत भाजप घोडेबाजार करणार असल्याची टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देतांना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जर त्यांना घोडेबाजार होण्याची भीती आहे. तर त्यांनी उमेदवार मागे घ्यायला हवा होता. आमच्याकडे एक पक्ष म्हणून अधिक मतं आहेत. त्यांच्याकडे कमी मतं आहेत. त्यामुळे घोडेबाजार त्यांनी सुरू केला असल्याचे प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

Tags:    

Similar News