रात्री-अपरात्री-मध्यरात्री कधी ही भेटू एकनाथ शिंदेंची राज ठाकरे यांना ऑफर
गेली दहा वर्षे शिवाजी पार्क वर होत असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ( MNS ) च्या दीपोत्सवाला मनात इच्छा असूनही येता आलं नाही अशी खंत व्यक्त करून मुख्यमत्री एकनाथ शिंदे यांनी मनसे चे अध्यक्ष राज ठाकरे यांना आता रात्री अपरात्री मध्यरात्री केव्हा ही या, कधीही भेटू. फडणवीस आणि मी रात्री उशिरा पर्यंत काम करत असतो अशी थेट पब्लिक ऑफरच देऊन टाकली.;
गेली दहा वर्षे शिवाजी पार्क वर होत असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ( MNS ) च्या दीपोत्सवाला मनात इच्छा असूनही येता आलं नाही अशी खंत व्यक्त करून मुख्यमत्री एकनाथ शिंदे यांनी मनसे चे अध्यक्ष राज ठाकरे यांना आता रात्री अपरात्री मध्यरात्री केव्हा ही या, कधीही भेटू. फडणवीस आणि मी रात्री उशिरा पर्यंत काम करत असतो अशी थेट पब्लिक ऑफरच देऊन टाकली.
शिवाजी पार्क वर झालेल्या दीपोत्सवामध्ये यंदा भाजपा-बाळासाहेबांची शिवसेना आणि मनसे अशी युती झालेली दिसली. राज ठाकरे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आवर्जून उपस्थिती लावली. मुंबई तसंच शिवाजी पार्क भागातील शिवसेनेच्या अस्तित्वाला आव्हान देण्यासाठी आता हे तिन्ही पक्ष एकत्र येऊन काम करतील असंच चित्र दिसत आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्या दीपोत्सवाला शुभेच्छा देत दीपोत्सवामुळे नवं चैतन्य येईल असं म्हटलं आहे. तर एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांनी वेळोवेळी जनतेचे प्रश्न घेऊन घेतलेल्या भेटींचा हवाला देत आता कधीही भेटू अशी ऑफर ही दिली आहे. एकनाथ शिंदे यांचा नातू हा त्यांचा वीक पॉईंट आहे, त्यामुळे राज ठाकरे यांच्या नातूचा उल्लेख करताना त्यांनी 'आवडता' विषय म्हणत राज ठाकरे यांच्या नातवाला ही दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.