देवेंद्र फडणवीस यांनी 'शिवसन्मान पुरस्कार' निमित्त मोदींचे केले अभिनंदन.
साताऱ्यातील राजघराणे व तमाम शिवभक्तांच्या वतीने आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने देण्यात येणारा पहिला 'शिवसन्मान पुरस्कार' पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर करण्यात आला आहे. सातारा येथे दि. १९ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या भव्य-दिव्य कार्यक्रम सोहळ्यात या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे.
यानिमीत्त राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या एक्स अकाऊंट (X Handle) वरुन पोस्ट शेअर करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शिवसन्मान पुरस्कार जाहीर केल्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं आहे.