देवेंद्र फडणवीसांना निवडणूक बंदी सोबतच होऊ शकतो सहा महिन्यांचा कारावास

Update: 2023-05-11 02:23 GMT

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीसाठी देवेंद्र फडणवीस devendra fadanavis यांचे प्रतिज्ञापत्र भरत असताना दोन गुन्ह्यांची माहिती नजरचुकीने राहून गेल्याची स्पष्ट कबुली फडणवीसांचे वकील अॅड. उदय डबले यांनी नागपूर प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांच्यासमोर दिली आहे. यामुळे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अडचणीत येण्याची शक्यता आहे.

फडणवीस यांनी निवडणूक आयोगाला (Election commision) माहिती देत असताना दोन गुन्ह्याची माहिती लपविल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी यासाठी अॅड. सतीश उके यांनी खटला दाखल केला होता. या खटल्याची पुढील सुनावणी ७ जून रोजी होणार आहे. या प्रकरणात फडणवीस दोषी आढळल्यास त्यांना निवडणुक बंदी तसेच कारावास देखील होऊ शकतो. या खटल्याचे कामकाज अॅड. सतीश उके यांच्यावतीने अॅड.तरुण परमार यांनी पाहिले.

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत फडणवीस यांनी नामनिर्देशन पत्र भरताना दाखल गुन्ह्यांची माहिती लपउन निवडणूक आयोगाला खोटी माहिती पुरवल्यासंदर्भात अॅड. सतीश उके यांनी लोकप्रतीनिधीत्व कायद्याच्या १२५ ए अंतर्गत केस दाखल केली होती.यापुढे सुप्रीम कोर्टात जाऊन देखील फडणवीस यांना दिलासा मिळाला नाही. त्यांना या अगोदरच या प्रकरणी जामीन मिळाला आहे. या प्रकरणी त्यांच्या वकिलांनी केलेल्या कबुलीमुळे त्यांच्या अडचणी वाढू शकतात.

Tags:    

Similar News