राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकदा एका व्यासपीठावर एकत्र आले होते. निमित्त होते पुण्यातील भामा-आसखेड पाणी पुरवठा योजनेचा ऑनलाईन पद्धतीने लोकार्पण सोहळ्याचे.... दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर येणार असल्याने संपूर्ण मीडियाचे या कार्यक्रमाकडे लक्ष होते. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी मीडियाला चिमटे काढत अजित दादांना एक ऑफर दिली.