मनोहर भिडेच्या अटकेची मागणी अन् पृथ्वीराज चव्हाण यांना जीवे मारण्याची धमकी

Update: 2023-07-30 15:56 GMT


माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण ( pruthviraj chvhan) यांनी २८ जुलै रोजी विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मनोहर भिडे( manohar  bhide) , याच्या अटकेची मागणी सरकारकडे केली. महात्मा गांधी यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केलं होतं म्हणून भिडे ला अटक करण्याची चव्हाण यांनी मागणी केली होती.

या घटनेला दोन दिवस झाल्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांना धमकीचा ( threat )एक ईमेल आलाय. त्यानंतर चव्हाण यांच्या कराड इथल्या घराची सुरक्षा वाढविण्यात आलीय. भिडे च्या विरोधात बोलाल तर जीवे मारू अशा आशयाचा तो ईमेल आहे. यासंदर्भात कराड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलीय. त्यानंतर चव्हाण यांच्या घराला अधिकची सुरक्षा देण्यात आल्याचं चव्हाण यांच्या कार्यालयातून सांगण्यात आलंय.

मनोहर भिडे याने महात्मा गांधींच्या पालकांविषयी आक्षेपार्ह विधानं केली होती. त्यावर सरकार का मौन बाळगून आहे, भिडेला सरकार अटक का करत नाही, असे प्रश्न पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केले होते. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांनी सरकार या प्रकरणात लक्ष घालेल, असं आश्वासन दिलं होतं. दरम्यान, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भिडे च्या वक्तव्याचा निषेध करत सरकार त्यांच्याविरोधात ठोस पावलं उचलेल, असं आश्वासन दिलं.

Tags:    

Similar News