मोदींच्या फोटोचे विद्रुपीकरण करणे चांगलंच भोवलं; कुणाल राऊतांना दोन दिवसाची पोलीस कोठडी
नागपूर : महाराष्ट्र प्रदेश युवक अध्यक्ष कुणाल राऊत यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोला विद्रुप केल्याप्रकरणी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
जिल्हा परीषदेच्या प्रांगणामध्ये आंदोलन करत असताना कुणाल राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फोटोला काळ फासल्यामुळे रविवारी रात्री कुणाल राऊत यांना पोलीस प्रशासनाकडून अटक करण्यात आली होती.
त्यानंतर कुणाल राऊत यांना जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने राऊत यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती राऊत यांचे वकील दीपैन जिगैशी यांनी माध्यमांपुढे बोलताना दिली