दानिश सिद्दीकीसाठी कुलगुरुंनी नियम मोडला....

Update: 2021-07-18 15:54 GMT

भारतीय फोटो पत्रकार दानिश सिद्दीकी यांचा अफगानीस्तान संघर्षात मृत्यू झाल्यानंतर जगभरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ते न्यूज़ एजेंसी रॉयटर्ससाठी अफगानिस्तान मध्ये रिपोर्टिंग करत होते.

अमेरिकेच्या सुरक्षा रक्षकांनी अफगानिस्तानमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर तालिबान आणि अफगानिस्तानमधील सुरक्षा रक्षकांदरम्यान संघर्ष सुरु आहे.

कंधार मध्ये या संघर्षाचं कव्हरेज करत असताना शुक्रवारी दानिश सिद्दीकी या संघर्षामध्ये मारले गेले. ते अफगान सुरक्षा रक्षकांसोबत या संघर्षांचं कव्हरेज करत होते.

भारतातील अफगान चे राजदूत फरीद ममुंडजाय यांनी या संदर्भात ट्वीट करत या संदर्भात माहिती दिली होती. दरम्यान दानिश यांचं पार्थिव भारतात आणलं जाणार आहे.

जामिया इस्लामिया विद्यापीठाने रविवारी दानिश यांच्यावर जामिया मिल्लिया इस्लामियाच्या कब्रस्तानात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. जामिया विद्यापीठाच्या कुलगुरुंनी प्रोटोकॉलला तोडत याला मंजुरी दिली आहे.

सामान्यत: या कब्रस्तानमध्ये जामिया चे कर्मचारी, अल्पवयीन मुलांसाठी राखीव ठेवलं जातं. परंतु सिद्दीकी यांना विद्यापीठाच्या कुलगुरुंकडून विशेष परवानगी देण्यात आली आहे.

दरम्यान सिद्दीकी हे याच विद्यापीठाचे विद्यार्थी होते. कुलगुरू कार्यालयातून प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार, दानिशच्या कुटूंबाने केलेल्या विनंतीनुसार दानिशचा मृतदेह जामियाच्या दफनभूमीतच पुरला जाईल. ही दफनभूमी सहसा विद्यापीठाच्या कर्मचार्‍यांसाठी, कर्मचाऱ्यांची पत्नी/ पती किंवा अल्पवयीन मुलांसाठी राखीव असतेय

मात्र, सिद्दीकी कुटुंबाचे जामिया विद्यापीठाशी अनेक वर्षाचे संबंध राहिलेले आहेत. त्यांचे वडील मोहम्मद अख्तर सिद्दीकी हे याच विद्यापीठात प्राध्यापक होते आणि ते जामिया नगर मध्ये राहायचे. स्वतः सिद्दीकी जामियाचे विद्यार्थी होते. त्यांनी विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयाची पदवी आणि विद्यापीठातून जनसंवादात पदव्युत्तर शिक्षण घेतले होते.

Tags:    

Similar News