कोविडची तिसरी लाट : टास्क फोर्सची 'माझा डॉक्टर' ऑनलाईन वैद्यकिय परिषद

सणासुदीच्या तोंडावर महाराष्ट्रात कोविडच्या तिसऱ्या लाटेचे संकट रोखण्यासाठी कोविड राज्य कृती दलाने रविवार ५ सप्टेंबर रोजी ‘माझा डॉक्टर’ ऑनलाईन वैद्यकीय परिषद आयोजित केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे परिषदेत सहभागी होणार आरोग्य मंत्री राजेश टोपे, वैद्यकिय शिक्षण मंत्री अमित देशमुख उपस्थित राहणार आहेत.;

Update: 2021-09-01 13:01 GMT

महाराष्ट्रात टास्कफोर्सच्या मदतीने कोविड नियंत्रण केले जात असून लॉकडाऊन आणि उपाययोजना देखील राबवण्यात येत आहेत. आगामी सणासुदीच्या काळात कोविड संक्रमण वाढणार असल्याचे सांगितले जात आहे.

रविवारी सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत होणारी परिषद समाज माध्यमांवरून प्रसारित केली जाणार आहे. राज्यातील सर्व फॅमिली डॉक्टर्स, वैद्यकिय तज्ञ तसेच नागरिकांनाही परिषदेस ऑनलाईन पद्धतीने उपस्थित राहता येणार आहे.

या परिषदेतील चर्चेमुळे कोविडच्या तिसऱ्या लाटेच्याने शंका तसेच घ्यावयाची काळजी अशा विविध बाबींची माहिती घेता येणार आहे.

या परिषदेसाठी www.facebook.com/onemedhealth यावर प्रश्न पाठवता येतील, असे मुख्यमंत्री कार्यालयाने कळवले आहे.

परिषदेत कोविड राज्य कृती दलाचे अध्यक्ष डॉ. संजय ओक, सदस्य डॉ राहूल पंडित, डॉ शशांक जोशी, डॉ. अजित देसाई मुलांसाठीच्या राज्य कृती दलाचे अध्यक्ष डॉ सुहास प्रभू, तसेच अमेरिकेतील डॉ मेहुल मेहता सहभागी होणार आहेत. परिषदेत राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, सार्वजनिक आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास उपस्थित राहणार आहेत. ही परिषद cmomaharashtra यांच्या ट्विटर, फेसबुक व युट्युब वरुन देखील पाहता येणार आहे. राज्यात तिसऱ्या लाटेचे संकट लक्षात घेऊन ५ सप्टेंबरपर्यंत १२०० डॉक्टरांचे काउन्सिलिंग करुन त्यांची भरती करण्यात येणार आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या संदर्भात आधी राज्यात १२००-१३०० मॅट्रिक टन ऑक्सिजनची उपलब्धतेवरुन आता २ हजार पर्यंत वाढवली आहे. औषधे, आवश्यक साधने, बेड्स, अँम्बुलन्स खरेदी केल्या आहेत. १ हजार अँम्बुलन्समधील उरलेल्या ५०० सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस प्राथमिक आरोग्यापर्यंत उपलब्ध होतील, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यापूर्वीच घोषीत केले आहे.

Tags:    

Similar News