कोरोनावरील दोन भारतीय आणि दोन परदेशी लसींना सध्या भारतात मान्यता देण्यात आली आहे. तर आणखी काही कंपन्यांच्या लस अंतिम टप्प्यात आहेत. या पार्श्वभूमीवर कोरोनावरील नाकाद्वारे ( Nasal spray)स्प्रेच्या माध्यमातून देता येईल अशा लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला लवकरच सुरूवात होणार आहे.
Glenmark Pharmaceuticals कंपनीने याबाबत माहिती दिली आहे. कंपनीने गेल्या आठवड्यात औषध महानियंत्रकांकडे Nasal spay आयातीची परवानगी मागितली होती. पण तज्ज्ञांच्या समितीने आधी कंपनीला या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या करण्यास सांगितले होते.
या लसीच्या निर्मितीमध्ये ग्लेनमार्क कंपनीने कॅनडाची कंपनी सॅनोटीझसोबत भागीदारी केली आहे. ग्लेनमार्कची नाकाद्वारे दिली जाणारी लस सध्या इतर काही देशांमध्ये वापरली जात आहे. या लसीमुळे श्वसनमार्गातील वरच्या भागात कोरोनाचे विषाणू नष्ट होतात. तसेच कोरोनाच्या संसर्गात anti viral ट्रीटमेंट म्हणून या nasal spary चा फायदा होतो, असेही कंपनीने सांगितले आहे. ग्लेनमार्क कंपनीच्या Fabiflu गोळ्या या कोरोना बाधीत रुग्णांवर उपचार