उध्दव ठाकरे यांचे गाल सुजले- किरीट सोमय्या
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे गाल सुजले आहेत, असे भाजप नेते किरीट सोमय्या का म्हणाले?;
खासदार नवणीत राणा यांना जामीन मिळाल्यानंतर दिल्लीत राजकीय खलबतांना वेग आला आहे. त्यातच भाजप नेते किरीट सोमय्या दिल्लीत दाखल झाले आहेत. त्यांनी खासदार नवणीत राणा यांची भेट घेतली. त्यानंतर किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे गाल सुजले असल्याचे म्हटले आहे.
राणा दांपत्याने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन हनुमान चालीसा पठन करण्याचा इशारा दिल्याप्रकरणी त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याप्रकरणी राणा दांपत्याला बारा दिवस तुरूंगात काढावे लागले. त्यानंतर कोर्टाने राणा दांपत्याला जामीन दिला. त्यामुळे राणा दांपत्य दिल्लीत दाखल झाले. तर दिल्लीत राणा दांपत्याने नेत्यांच्या भेटीगाठीचा सपाटा लावला आहे. त्यातच भाजप नेते किरीट सोमय्या दिल्लीत दाखल झाले आहेत. तर त्यांनी खासदार नवणीत राणा यांची भेट घेतली. त्यावेळी बोलताना किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना टोला लगावला.
किरीट सोमय्या म्हणाले, खासदार नवणीत राणा यांनी हनुमान चालीसा पठन करायची म्हटले त्यामुळे त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र सर्वोच्च न्यायालयाने राजद्रोहाचा खटलाच स्थगित करण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे आधी मुंबई सत्र न्यायालय, उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयानेही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या गालावर थपडा मारल्या आहेत. उद्धव ठाकरे यांना दोनच गाल आहेत. किती वेळा चपराक देणार कोर्ट. बघा कसे सुजले आहेत गाल, अशा शब्दात किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर टीका केली.