देलकर प्रकरण दाबण्यासाठी हे कुभांड रचलं गेलंय; सचिन सांवत यांचा आरोप
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप करुन गृहमंत्र्यांनी दरमहा 100 कोटी रुपयांची मागणी केली, असा दावा परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात केल्यानंत राज्यात राजकीय भुकंप झाला आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी या प्रकरणात असताना कॉंग्रेसने आता काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांच्या मार्फत प्रतिक्रिया देत देलकर प्रकरण दाबण्यासाठी हे कुभांड रचलं गेलंय असा आरोप केला आहे.;
महाराष्ट्रातही विनोद राय प्रवृत्तीचे लोक प्रशासनात आहेत. सत्यपाल सिंह आघाडी सरकारला कळले नाही. जे पत्र दिसत आहे, त्यामध्ये पश्चात बुध्दी दिसत आहे. जे संभाषण आज दाखवले जात आहे ते वर्षभरापूर्वीच झाले असते. अँटीलिया प्रकरण झाल्यानंतर कोणीही सामान्य बुद्धीचा व्यक्ती ही असे करणार नाही, असे सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.
जे खंडणीचे आरोप सांगितले जात आहेत ते भाजपाने आधीच कसे केले? सुशांत सिंह राजपूत याची केस पटणा येथे नोंदवली जाऊ शकते तर मोहन देलकर यांची मुंबईत आत्महत्या झाली तिथे का नाही? जीथे गुन्हा घडला तिथेच CRPC प्रमाणे तपास होतो. SMS हे स्वतःला वाचवण्यासाठी दिसत असल्याचेही सावंत म्हणाले.
अगोदर काही अधिकारी दिल्लीच्या दबावात आहेत, असे गृहमंत्र्यांनी महिनाभरापूर्वी सांगितले होते. केंद्रीय यंत्रणांच्या दबावाखाली अधिकाऱ्यांना आणून भाजपने मविआ सरकारविरोधात अत्यंत कुटील षडयंत्र केलेलं दिसत आहे. भाजप नेत्यांना माहिती आधीच मिळते व ज्या सुसुत्रपणे ते प्रतिक्रिया लागलीच देतात त्यातून हे स्पष्ट होत असल्याचाही दावा सावंत यांनी केलाय.
जी तत्परता अंबानी प्रकरणात केंद्राने दाखवली ती देलकर प्रकरणात का नाही? देलकर यांनी मोदी शाह यांना पत्र लिहून व्यथा मांडली. पण त्याकडे लक्ष दिले नाही. त्यांनी राजीनामा दिला का? देलकर प्रकरणात भाजपचे हात अडकले असून हे दाबण्यासाठी कुभांड रचलं गेले आहे हे पत्रातून स्पष्ट होत असल्याचा आरोप सचिन सांवत यांनी केला आहे.