काँग्रेस आमदार घेणार सोनिया गांधी यांची भेट घेणार, कोणाची तक्रार करणार?
महाराष्ट्र विधीमंडळाच्यावतीने विधानसभा व विधानपरिषदेच्या नवनिर्वाचित आमदारांसाठी लोकसभा सचिवालय आणि प्राईड संस्थेच्या संयुक्त विद्यमाने ५ आणि ६ एप्रिल २०२२ ला संसदीय प्रशिक्षण कृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमांतर्गत राज्यातील नवनिर्वाचित आमदारांसह एकूण ११० आमदारांनी नोंदणी केली आहे. या कार्यक्रमाला उपराष्ट्रपती, राज्यसभेचे सभापती एम. व्यंकैय्या नायडू लोकसभा अध्यक्ष ओम बिरला तसेच महाराष्ट्र विधीमंडळाचे पिठासीन अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमासाठी काँग्रेस चे आमदार देखील उपस्थित आहेत. या कार्यक्रमाला काँग्रेस चे आमदार संग्राम थोपटे देखील उपस्थित असणार आहेत. काँग्रेस चे हे सर्व उपस्थित आमदार सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. या भेटीसंदर्भात आमचे दिल्ली चे प्रतिनिधी शिवाजी काळे यांनी या आमदारांशी बातचीत केली…