पवारांच्या त्या टीकेमुळे सरकार अस्थिर?

शरद पवार यांनी नुकताच एका मुलाखतीमध्ये राहुल गांधी यांच्यावर टीका केली होती त्या टिके वरून आता काँग्रेसने इशारा दिलेला आहे

Update: 2020-12-05 05:17 GMT

विकास आघाडी सरकारला नुकतच एक वर्ष पूर्ण झालेले असतानाच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या एका मुलाखतीमुळे महाविकास आघाडीमध्ये नाराजी नाट्य सुरू झालेले आहे. दैनिक लोकमतसाठी समूहाचे अध्यक्ष विजय दर्डा यांनी शरद पवार यांची मुलाखत घेतली होती. या मुलाखतीमध्ये शरद पवार यांनी राहुल गांधी यांच्या नेतृत्वामध्ये सातत्य दिसत नाही अशा स्वरूपाचं वक्तव्य केलं होतं. पण आता यावरून काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये अशाप्रकारे मित्रपक्षांनी वक्तव्य करू नये असं आवाहन महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी ट्विटरद्वारे केलेल आहे.

"काँग्रेसचं नेतृत्व अतिशय स्थिर आहे, निर्णयक्षम आहे. राज्यातील महाविकास आघाडी हा त्याच निर्णयक्षमतेचा परिपाक आहे." असे ट्विटमध्ये म्हणत एकप्रकारे काँग्रेसमुळेच महाविकासआघाडीचे सरकार स्थिर आहे असा इशाराही त्यांनी दिला आहे. त्याचबरोबर


"आघाडी मधील काही नेत्यांच्या काही मुलाखती/लेख माझ्या निदर्शनास आलेयत. काँग्रेसची कार्याध्यक्षा म्हणून मला आघाडीतील मित्रपक्षांना सांगू इच्छिते की हे सरकार स्थिर राहावं असं वाटत असेल कर काँग्रेसच्या शीर्ष नेतृत्वावर टीका-टीप्पणी करणे टाळावं. आघाडी धर्माचं पालन सर्वांनी करावं." असं आवाहन देखील त्यांनी केलेले आहे.

एकूणच मोदी सरकार विरोधामध्ये राष्ट्रीय आघाडीची ची तयारी शरद पवार यांनी सुरू केलेली असताना अशाप्रकारे काँग्रेस नेतृत्वाबद्दल त्यांनी केलेल्या टिप्पणीमुळे काँग्रेसमध्ये नाराजी आहे आता शरद पवार ही नाराजी कशी दूर करतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Tags:    

Similar News