बिनकामाच्या भोंग्यांना किंमत देत नाही, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा राज ठाकरेंवर निशाणा

राज्यात भोंग्यांवरून वाद पेटला आहे. त्यातच राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यातून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. त्यावर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना टोला लगावला.;

Update: 2022-04-26 05:57 GMT

मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यावरून इशारा दिल्यानंतर राज्यात भोंगे चर्चेत आले. तर त्यापाठोपाठ ठाण्याच्या उत्तरसभेतही राज ठाकरे यांनी भोंग्यांवरून राज्य सरकारला इशारा दिला. त्यानंतर राज्यात भोंग्यावरून वाद रंगला होता. तर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी याबाबत सर्वपक्षीय बैठकही घेतली. मात्र या बैठकीला मनसे आणि भाजप या दोन्हीही पक्षाचे नेते उपस्थित राहिले नाहीत. मात्र या भोंग्यांच्या वादाचा संदर्भ देत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. ते नॅशनल मॉबिलीटी कार्ड या सुविधेच्या लोकार्पण कार्यक्रमात बोलत होते.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे म्हणाले की, ज्यांना Acidity झालीय, ज्यांच्या पोटात आगडोंग उसळला आहे. ज्यांना जळजळतंय, मळमळतंय त्यांनी राज्यातील किती शाळांचा दर्जा उंचावून दाखवला आहे हे सांगावे. उगीच बिनकामाचे भोंगे वाजनणारांना मी काडीचीही किंमत देत नसल्याचे सांगत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता टोला लगावला.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी हिंदूत्व सोडले असल्याच्या टीकेवरही प्रत्युत्तर दिले. यावेळी उध्दव ठाकरे म्हणाले की, हिंदूत्व म्हणजे काय धोतर आहे का? जे घालावं आणि सोडांवं. त्यामुळे जे आम्हाला हिंदूत्व शिकवत आहेत. त्यांनी हिंदूत्वासाठी काय केले असा सवाल मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी उपस्थित केला.

यावेळी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी बाबरी पाडली त्यावेळी तुम्ही कुठे बिळात लपून बसला होतात का? असा प्रश्न उपस्थित केला.तसेच राम मंदिर बांधण्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला. मात्र मंदिर बांधण्यासाठीही तुम्ही झोळ्या पसरल्या असा घणाघात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केला.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा पठन करण्याचा इशारा राणा दांपत्याने होता. त्यावरून राणा दांपत्याचा चांगलाच समाचार घेतला. यावेळी उध्दव ठाकरे म्हणाले की, साधु संत येती घरा तोचि दिवाळी दसरा अशी म्हण आहे. त्यामुळे ते नीट बोलून आले असते तर स्वागत केले असते. मात्र दादागिरी करून आलात तर दादागिरी सहन केली जाणार नाही, असेही यावेळी उध्दव ठाकरे म्हणाले.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी एक जाहीर सभेतून विरोधकांचा समाचार घेणार असल्याचेही म्हटले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा कधी होणार हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.

Tags:    

Similar News