श्रीकांत शिंदे फ्रंटलाईनवर : अजित दादांना दिलं आव्हान...
ऐन गणेशोत्सवात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे गटात वाद पेटला असताना आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंनी थेट विरोधीपक्षनेते अजित पवारांना आता अंगावर घेतलं आहे..;
ऐन गणेशोत्सवात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे गटात वाद पेटला असताना आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंनी थेट विरोधीपक्षनेते अजित पवारांना आता अंगावर घेतलं आहे..
राज्यातील सत्तापरीवर्तनानंतर ठाकरे गटाच्या शिवसेनेकडून सातत्यांने गद्दार अशी संभावना केली जात आहे. उध्दव ठाकरेंच्या आदेशानंतर आदित्य ठाकरेंनी संवाद यात्रा सुरु झाल्यानं शिंदे गटात अस्वस्थता पसरली होती. ठाकरे गटाला शह देण्यासाठी आता शिंदे गट देखील आक्रमक झाला आहे. थेट आदित्य ठाकरेंच्या विरोधात मुख्यमंत्री पुत्र खासदार श्रीकांत शिंदे उतरले आहे.
विशेष म्हणजे नवरात्रौ आणि गणेशोत्तवाचा पुरेपुर उपयोग करत शिदे सरकार लोकाभिमुख होण्याचा प्रयत्न करत आहे. उध्दव ठाकरेंना घरुन काम करण्यावर टिका सहन करावी लागत होती. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या घरोघरी जाऊन गणपती दर्शन करत आहे. मंत्रालयातील सहाव्या मजल्याची संपूर्ण जबाबदारी श्रीकांत शिंदे यांनी हाती घेतली आहे. त्याशिवाय मुख्यमंत्री शिंदेच्या वर्षा निवासस्थानी येण्या जाणाऱ्यांचं सर्व व्यवस्था करण्यात खा. शिंदे आघाडीवर आहेत.
ठाकरे गटाला टार्गेट करण्याबरोबरच महाविकास आघाडीत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी देखील शिंदे गटाच्या रडारवर आहेत. नुकत्याच संपलेल्या विधीमंडळाच्या पावसाळी आधिवेशनात विरोधक पायऱ्यांवर आक्रमक असले तरी सभागृहाच्या कामकाजात विरोधी पक्षनेते अजित पवार आपला अनुभव आणि मुस्सदीपणा वापरुन सत्ताधाऱ्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत होते.
दादा हा 'शो' नाही ,
— Dr Shrikant Eknath Shinde (@DrSEShinde) September 4, 2022
पहाटेच्या फ्लॉप 'शो'सारखा…
हा 'शो'ले आहे ,
एव्हरग्रीन ब्लॉकबस्टरसारखा !
आणि हो …
हिंदुत्वाचे तेज आणि विकासकामांच्या 'ट्रेलर'नेच धडकी भरली ?
… पिक्चर अभी बाकी है' !!!#khatteangur
ठिकठिकाणी दौऱ्यामधे असताना अजितदादा शिंदे सरकारवर टिका करत आहे. त्याला उत्तर देताना आता थेट खा. श्रीकांत शिंदे रिंगणात उतरले आहेत. दादा, हा `शो` नाही, पहाटेच्या फ्लॉप `शो` सारखा.. हा `शो` ले आहे.. एव्हरग्रीन ब्लॉकबस्टरसारखा..
आणि हो.. हिंदुत्वाचे तेज आणि विकासकामांच्या ट्रेलरनेच धडकी भरली पिच्चर अभी बाकी आहे असं सांगत थेट विरोधी पक्षनेत्याचा आता खा. शिंदेंनी अंगावर घेतलं आहे.