छत्रपती सुरतला गेले स्वराज्यासाठी, अन् हे गेले महाराष्ट्र लुटारूंच्या चरणी लोटांगणासाठी - उध्दव ठाकरे
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उध्दव ठाकरे यांचा वेगवेगल्या ठिकाणी सभेचा दौरा चालू आहे. यादरम्यान एका सभेत बोलताना त्यांनी शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांच्यावर निशाणा साधला आहे.
छत्रपची शिवाजी महाराज सुरतला गेले होते गे स्वराज्यासाठी आणि हे सरतला गेले ते महाराष्ट्र लुटणाऱ्यांच्या पायावर घालीन लोटांगण करणयासाठी अशा शब्दात उध्दव ठाकरेंनी त्यांना सणसणीत टोला लगावलेला आहे.
त्यावरुन भरत गोगावले यांनी पलटवार करत असं म्हटलं की, छत्रपती शिवाजी महाराज सुरतला चांगला काम करण्यासाठी गेले होते, तर आम्ही सुध्दा चांगलं काम करण्यासाठी गेलो होतो, त्यात काय वाईट एवढं असं गोगावले म्हणाले.