उद्यापासूनचे सर्व नियोजित कार्यक्रम व दौरे रद्द; संभाजी राजेंनी ट्विट करत दिली माहिती
काही कारणास्तव उद्यापासूनचे सर्व नियोजित कार्यक्रम व दौरे रद्द करण्यात आलेले आहेत. क्षमस्व ! असे ट्विट छत्रपती संभाजी राजेंनी केले आहे.
देशातल्या लोकसभा निवडणुकांचे बिगुल हे काही दिवसातच वाजणार आहे यातच सर्वच राजकीय पक्ष आपापल्या तयारीला लागले आहेत. स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष संभाजी राजे छत्रपती व त्यांचा स्वराज्य पक्ष हा महाविकास आघाडी सोबत निवडणूक लढवणार की महायुती सोबत यावरून स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष संभाजी राजे छत्रपती मागच्या काही दिवसांपासून बरेचसे चर्चेत आहेत.
संभाजीराजे छत्रपती हे महायुती का महाविकास आघाडी कोणत्या पक्षाची साथ देनार या कारणावरून मागील काही दिवसात ते चांगले चर्चेत आहेत, यातच छत्रपती संभाजीराजे छत्रपती यांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत माझ्या संपर्कात दोन्ही पक्षांचे नेते आहेत, दोन्ही पक्षांकडून मला ऑफर आहेत, त्यामुळे कोणत्यातरी एका पक्षाची साथ देणं हे निश्चित आहे, असं संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं होतं.
मात्र यातच काल म्हणजे ( १/०१/२०२४ ) रोजी संभाजीराजे छत्रपती यांनी ट्विट करत, "स्वराज्य पक्ष असताना इतर कोणत्याही पक्षात प्रवेश करण्याचा प्रश्न येतच नाही, राज्यातील जनतेच्या विश्वासावर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजकारणाचे भविष्य हे स्वराज्य असेल या ध्येयाने माझी व स्वराज्य पक्ष संघटनेची वाटचाल सुरूच राहणार आहे". असे ट्विट केले होते त्यानंतर संभाजी राजे छत्रपती हे कोणत्याच पक्षासोबत जाणार नसल्याचे स्पष्ट झाले होते.
यातच आता "काही कारणास्तव उद्यापासूनचे सर्व नियोजित कार्यक्रम व दौरे रद्द करण्यात आलेले आहेत. क्षमस्व ! असं ट्विट त्यांनी त्यांच्या एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केले आहे. यामागे नेमके काय कारण आहे ? येणाऱ्या दिवसात संभाजी राजे छत्रपती हे स्वतंत्र निवडणूक लढवतात किंवा इतर पक्षांच्या सोबत जाऊन निवडणुका लढवतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.