महाविकास आघाडी सर्वत्र फेल झाली असून एकापाठोपाठ एक मंत्री आतामधे जात आहेत. १९९३ च्या मुंबईमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटानंतर एन.एम व्होरा साहेबाची जी कमिटी गठीत करण्यात आली होती, त्या व्होरा कमिटीच्या अहवालामध्ये मोठ्याप्रमाणावर अंडरवर्ल्ड, माफिया,ब्युरोकसी, गव्हरमेंटमधले अधिकारी तसेच राजकीय नेते यांच्यामधले घनिष्ट संबंध, यामधले फायनान्शिअल डिलींग्स, फायनान्शिअल ट्रान्सझॅक्शन याच्या सदर्भासह पुराव्यानिशी हा अहवाल तयार करण्यात आला आहे, आता नवाब मलिकांनी राजीनामा द्यावा अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.