चंद्रकांत दादांनी मोठ्या मनाने पराभव स्वीकारवा : जयंत पाटलांचा टोला
विधानपरीषद निवडणुकीत महाविकास आघाडीनं मोठं यश मिळाल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी मोठ्या मनाने पराभव स्वीकारला पाहिजे असा टोला यावेळी जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे.;
विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघांत अनपेक्षितपणे भाजपाला मोठा फटका बसला आहे. नागपूर आणि पुणे या भाजपने प्रतिष्ठेच्या केलेल्या पदवीधर मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारनं विजय मिळवला आहे. पुणे मतदारसंघात तब्बल २० वर्षांनंतर भाजपाला पराभवाचं तोंड पाहवं लागलं आहे. नेहमी भाजपाला साथ देणाऱ्या पुणेकर मतदारांनी यंदा राष्ट्रवादीच्या पारड्यात मतं टाकून भाजपाच्या गडाला खिंडार पाडलं आहे. दरम्यान, या नंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या शैलीत चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला आहे.चंद्रकांत पाटील यांनी मोठ्या मनाने पराभव स्वीकारला पाहिजे असा टोला यावेळी जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे.
विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मिळालेल मतदान बघितलं तर भारतीय जनता पक्षाला भविष्यात 10 वेळा विचार करावं लागेल अशी टिका यावेळी जयंत पाटील यांनी केली.
महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर विरोधकांनी सरकारच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त करत टिका केली होती.त्यावर जयंत पाटील यांनी भाष्य केलं आहे.विधानपरिषदेच्या निवडणुकीचा निकाल पाहता पुन्हा राज्याची जनता महाविकास आघाडी सरकारच्या मागे आहे हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे.
पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीनंतर चंद्रकांत पाटील यांनी तिन्ही पक्षांनी एकत्र लढावं असं म्हटलं होतं त्यावर भाष्य करत जयंत पाटील म्हणाले कि चंद्रकांत पाटील यांचे स्वप्न तूर्तास तरी आम्ही पूर्ण करू शकणार नाही पुढची अनेक वर्षे भारतीय जनता पक्षाला 3 पक्षाच्या या सरकारला सहन करावा लागणार आहे असा टोलाही लगावला.
विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत आघाडी सरकारच्या तिने पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निवडणुकीत मेहनत घेतली त्यामुळे या निवडणुकीत सरकारला मोठ्या प्रमाणात यश मिळाले आहे या निवडणुकीत कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात मेहनत घेतली त्यामुळेच महाविकास आघाडी सरकारला पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत यश मिळाले आहे असे यावेळी जयंत पाटील म्हणाले.