भाजप काही दिवसांनी नारे देण्यासाठीही शिल्लक राहणार नाही - संजय राऊत

Update: 2024-04-03 07:43 GMT

जळगाव लोकसभा मतदारसंघातील भाजपचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील हे आपल्या विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह शिवसेनेच्या ठाकरे गटात मोठ्या संख्येने जाहीर प्रवेश करणार असल्याची घोषणा शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केली. या जाहीर पक्षप्रवेशानंतर उन्मेश पाटील शिवसेना यांची ताकद एकत्र येईल.आता भाजप काही दिवसांनी नारे देण्यासाठीही शिल्लक राहणार नाही असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

दरम्यान, जवळगावचा उमेदवार अद्यात जाहीर केलेला नाही. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आज किंवा उद्या दोन दिवसात उमेदवार जाहीर करतील. त्यानंतर सर्वांना कळेल की, जळगावची निवडणूक कोण लढणार? उन्मेश पाटील यांच्या पक्षप्रवेशाने शिवसेना अधिक बलकट होईल आणि जळगावातून शिवसेनेचा खासदार लोकसभेवर निवडून जाईल, असा विश्वास राऊत यांनी यावेळी व्यक्त केला.

भाजपचा वृक्ष मुळापासून उखडणार :

पंतप्रधान नरेंद्र मोदी अखंड हिंदुस्थानचे नारे देत होते, पाकव्याप्त काश्मीर हिंदुस्थानात आणू, चीनला धडा शिकवू, या त्यांच्या नाऱ्यांचे पुस्तक काढले पाहिजे, परंतु नारा आणि गर्जना यामध्ये फरक आहे, वाघाच्या डरकाळ्या आहेत, त्यांना त्यांचे नारे देऊ द्या म्हणत राऊंतांनी भाजपवर निशाणा साधला.

दरम्यान, संजय राऊत असंही म्हणाले की, भाजपचे जळगाव लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार उन्मेश पाटील हे आपल्या समर्थक आणि इतर अनेक पदाधिकाऱ्यांसह ठाकरे गटामध्ये प्रवेश करणार आहेत. ही भाजपची पडझड नसून भाजपचा वृक्ष मुळापासून उखडणार आहे.



 

निवडणूकीनंतर भाजपला सत्तेतून जावेच लागेल :

सर्वोच्च न्यायालयाने आम आदमी पार्टीचे संजय सिंह यांना जामीन मंजूर केला. तसेच ईडी आणि मोदी सरकारची पोसखोल केली आहे. तपास यंत्रणांचा गैरवापर करत विरोधकांना जेलमध्ये टाकण्याचे, विरोधकांचा आवाज दाबण्याचे प्रयत्न ते करत आहेत, असे राऊत म्हणाले.

संजच राऊत पुढे म्हणाले की, गेल्या १० वर्षांपासून देश भ्रष्टाचाराच्या आगीत होरपळत आहे, तर मणिपूर, अरूणाचल प्रदेश, जम्मू कश्मीरमधील कश्मीरी पंडित, चीनची घुसखोरी याविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी काहीच बोलत नाहीत. देशाच्या सुरक्षेबाबत पंतप्रधान चकार शब्द काढत नाहीत, ही गंभीर बाब आहे. ते फक्त विरोधकांवर आरोप करत आहेत. भाजपचा चेहरा बघायचा नाही. त्यामुळे निवडणूकीनंतर त्यांना सत्तेतून जावेच लागेल, असं संजय राऊत यावेळी म्हणाले.

Tags:    

Similar News

Kamla ahead of Trump?