"नागपूर-जो कोणी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात बोलेल, त्यांच्या धोरणांच्या विरोधात बोलेल, अशा लोकांची ईडी किंवा सीबीआय या तपास यंत्रणांमार्फत चौकशी लावण्याचं काम भाजपा करत आहे. यापूर्वी सीबीआयचा ही याच प्रकारे वापर करण्यात आला आहे.
पण सीबीआयच्या बाबतीत आम्ही आमचा स्वतंत्र निर्णय घेतला आहे. त्यांना या पुढे महाराष्ट्रात आमची परवानगी बंधनकारक असणार आहे. ईडीचा ही या प्रकारे उपयोग करणं हे अतिशय दूर्दैवी असून, भाजप हे सुडाचं राजकारण करत असल्याची टीका त्यांनी केली. यासोबतच, याआधी महाराष्ट्रात असा प्रकार कधीही पाहिला नसल्याचंही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं.