भाजप नेत्यांच्या अहंपणामुळे महाराष्ट्रातील सरकार गेलं - एकनाथ खडसे

महाविकास आघाडी सरकार भक्कम असून आपला कार्यकाळ पूर्ण करेल भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या अहंपणा मुळे महाराष्ट्रातील सरकार गेलं पण त्यांचा अहंपणा अजून सुटलेला नसल्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते मंत्री एकनाथ खडसे यांनी लगावला.;

Update: 2021-02-03 13:29 GMT

भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या अहंपणा मुळे महाराष्ट्रातील सरकार गेलं पण त्यांचा अहंपणा अजून सुटलेला नाही हे जनतेला माहीत असून कोण काय म्हणाल याकडे दुर्लक्ष करून आपण आपल्या कार्यक्रमाकडे लक्ष देऊ राज्यातील महाविकास आघाडी सरकार भक्कम असून आपला कार्यकाळ पूर्ण करणार असल्याचा टोला माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी भाजप नेत्यांना लगावला. ते आज जयंत पाटील यांच्या दौर्‍याच्या नियोजनासाठी जळगाव येथील राष्ट्रवादी भवनामध्ये आयोजीत करण्यात आलेल्या बैठकीत बोलत होते.

पुढे बोलताना खडसे यांनी, जळगाव जिल्ह्यातील अनेक नेते व पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्यासाठी इच्छुक असून राज्यातील महाविकास आघाडी सरकार भक्कम असून आपला कार्यकाळ पूर्ण करणार आल्याच म्हणाले.

Full View


Tags:    

Similar News