नितेश राणे यांची संजय राऊत यांच्यावर एकेरी भाषेत सडकून टीका

भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर एकेरी भाषेत सडकून टीका केली. महाराष्ट्रात विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. त्या दरम्यान राणे यांनी राऊत यांच्यावर टिका केली.

Update: 2023-03-01 15:26 GMT

महाराष्ट्राच्या विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ( BUDGET SESSION 2023) ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut) यांच्यावर भाजपाचे आमदार नितेश राणे ( Nitesh Rane ) यांनी एकेरी भाषेत सडकून टिका केली. तसेच सुरु असलेल्या भर अधिवेशनात राणे यांनी अध्यक्षांसमोर संजय राऊत यांचे फक्त १० मिनिटे संरक्षण काढा, ते परत कधीच दिसणार नाहीत, असे वक्तव्य करुन एकच खळबळ उडवून दिली. राऊत यांचा एकेरी उल्लेख करत नितेश राणे ( Nitesh Rane ) यांनी आपल्याला रोज सकाळी राऊत यांचे ऐकावं लागतं. महाराष्ट्राला याची गरज काय? असा सवाल राणे यांनी सभागृहात उपस्थित केला.

संजय राऊत ( Sanjay Raut) यांचा आणि ठाकरे गटाच्या शिवसेनेचा काय संबंध आहे. ते सामनामध्ये येण्याआधी त्यांचे सर्व लेख हे शिवसेनेच्या विरोधातील होते. तेव्ही त्यांची एवढी हिंमत होती की, ते हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विरोधात लिहायचे. शिवसेनेच्या विरोधात लिहायचे. आणि आता त्याच शिवसेनेचे गोडवे गात आहेत. बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या पत्नीचे पटत नाही, असं संजय राऊत ( Sanjay Raut) यांनी लिहिलं होतं. संजय राऊत ( Nitesh Rane ) यांना दिलेलं संरक्षण काढा. ते पोलिसांचं संरक्षण घेऊन फिरतात. ते सरकारने दिलेलं संरक्षण आहे, असं नितेश राणे यांनी सभागृहात म्हटलं.

संजय राऊत ( Sanjay Raut) यांनी मार्मिकमध्ये छापून आणलेलं कार्टून बघा, देशाचे गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल असं छापू शकतात का? त्यांना शिव्या देऊ शकतात का? त्यामुळे संजय राऊत ( Sanjay Raut) यांचे १० मिनिटे संरक्षण काढायला सांगा, ते उद्या सकाळी परत दिसणार नाही, एवढा शब्द देतो, असे वक्तव्य राणेंनी भर सभागृहात केले.   

Tags:    

Similar News