भाजप - MIM ची सेटींग उघड केंद्रीय मंत्र्याने सांगितलं सिक्रेट

Update: 2023-08-23 07:05 GMT

एमआयएम ही भाजपची बी टीम असल्याची टीका महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सातत्याने केली जाते. त्यापार्श्वभुमीवर रावसाहेब दानवे यांनी खळबळजनक वक्तव्य केलं आहे.

एमआयएम ही भाजपची बी टीम असल्याची टीका महाविकास आघाडीकडून केली जाते. मात्र भाजप आणि एमआयएमने त्याचा कामय इन्कार करत आले आहे. परंतू छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या विविध शासकीय योजनांच्या आढावा बैठकीनंतर मंत्री रावसाहेब दानवे यांनी मोठं वक्तव्य केलं. त्यामुळे एमआयएम भाजपची बी टीम असल्याच्या आरोपावर दानवे यांनी एक प्रकारे शिक्कामोर्तब केल्याची चर्चा रंगली आहे.

रावसाहेब दानवे यांनी इम्तियाज जलील यांच्यासोबत हस्तांदोलन केलं. त्यावरून पत्रकारांनी दानवे यांना प्रश्न विचारला असता भागवत कराड यांना निवडून आणण्यासाठी इम्तियाज जलील यांना उभं करावंच लागतं, असं वक्तव्य रावसाहेब दानवे यांनी केलं. त्यानंतर शेजारी बसलेले इम्तियाज जलील खळखळून हसल्याचे पहायला मिळाले. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप एमआयएम मॅच फिक्सिंग असल्याची चर्चा रंगली आहे.

भागवत कराड लोकसभेसाठी दावेदार

शिवसेनेत फूट पडल्यामुळे आता शिवसेनेची ताकद कमी झाली आहे. त्यामुळे शिवसेनेने छत्रपती संभाजीनगर हा मतदारसंघ भाजपला सोडावा, अशी मागणी भाजपने केली होती. त्यानंतर शिवसेनेतील शिंदे गटाने जोरदार आक्षेप दर्शवला होता. मात्र यानंतर आता भाजप भागवत कराड यांना निवडून आणण्यासाठी इम्तियाज जलील यांना उभं करणार असल्याची चर्चा रंगली आहे.

या वक्तव्याचे इम्तियाज जलील यांनीही खंडण केल्याचे दिसून आले नाही.

Tags:    

Similar News