नुकतेच जामीनावर सुटलेल्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.राणा दाम्प्त्याने माध्यमांशी बोलू नये अशी न्यायालयाने जामीन देताना अट दिली होती.या अटींचं उल्लंघन केल्याचा आरोप सराकरी पक्षाने केला आहे. यावरूनच जामिनाला राज्य सरकार राणा दाम्पत्याच्या जामिनाला आव्हान देणार आहे.
आमदार रवी राणा म्हणाले महाराष्ट्रात ओबीसी आरक्षणाचा खूप मोठा प्रश्न आहे. ओबीसींवर खूप मोठा अन्याय होत आहे. न्यायालयांमध्ये महाराष्ट्राचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्याचे अनेक महत्त्वाचे विषय बाजूला ठेवून नवनीत राणा आणि रवी राणा यांचा जामीन रद्द करण्यासाठी कोर्टात जाऊन ताकद लावत आहेत. मात्र, आम्ही कोर्टाचा कोणताही अवमान केलेला नाही.
आम्ही न्यायालयाच्या नियमांचं पालन करत आहोत.संविधानाचा आम्ही आदर करतो.आम्ही न्यायालयीन विषयाचा उल्लेख न करता प्रत्येक गोष्टींचं उत्तर दिलं आहे.जी घटना झाली त्याचा आम्ही उल्लेख केलेला नाही.आमच्याविरोधात अनेक यंत्रणा काम करत आहेत.आम्हाला रोखण्याचा प्रयत्न होतोय.आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतोय.असा आरोप रवी राणा यांनी केला आहे.
अनेक शिवसेना नेत्यांनी नवनीत राणा नाटक करत असल्याचा आरोप केला. नवनीत राणा आणि मला तुरुंगात टाकलं जातं आणि तरीही शिवसेनेचे नेते नाटक करत आहेत असं बोलत आहेत. मागील तीन दिवस नवनीत राणा यांच्यावर उपचार झालेत. ते जनतेपर्यंत पोहचलं आहे. आमच्यावर जो अन्याय झाला, मुख्यमंत्र्यांनी जे षडयंत्र केलं ते माध्यमांमध्ये यायला हवं.असं रवी राणा यांनी म्हटलं आहे.