अनिल बोंडेंना अटक, यशोमती ठाकूर म्हणाल्या 'कोणालाही सोडणार नाही'
अनिल बोंडेंना अटक, यशोमती ठाकूर म्हणाल्या ‘कोणालाही सोडणार नाही’;
अमरावती बंद दरम्यान भाजपाच्या वतीने तोडफोड, जाळपोळ तसेच पोलिसांना मारहाण केल्याने अमरावतीत आज सकाळ पासून भाजप नेत्यांना अटक सत्र सुरू आहे. तर अमरावतीत गेल्या तीन दिवसांपासून तणावपूर्ण शांतता असून काल व आज कुठल्याही प्रकारे गालबोट लागलं नाही. अशी माहिती अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली.
अमरावतीत संचारबंदी असल्याने नागरिकांना मूलभूत सुविधासाठी 2 ते 4 या वेळेला परवानगी देण्यात आली आहे. तसेच लवकरात लवकर परिस्थिती सामान्य होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तर अमरावती मधील 4 ते 5 हजार पोलीस वगळता राज्य राखीव दल पोलीस बंदोबस्तसाठी तैनात असल्याचे देखील त्यांनी सांगितले तर दंगल करणाऱ्या कोणालाही सोडणार नाही. अशी माहिती यशोमती ठाकूर यांनी दिली आहे.
दरम्यान आज पोलिसांनी भाजप नेते अनिल बोंडे यांना अटक केली होती. अटक झाल्यानंतर हिंदू मार खाणार नाही. अशी प्रक्षोभक प्रतिक्रीया अनिल बोंडे यांनी दिली आहे. अमरावतीतील हिंसा पूर्वनियोजन असल्याचं पोलिसांच्या तपासात निष्पण्ण झाले आहे, महाराष्ट्रात मोठी अशांतता माजवण्याचा डाव असल्याचं पोलीस सूत्रांचं म्हणणं आहे. दरम्यान पोलिसांनी बोंडे यांना अटक केली आहे.