अमरावती हिंसाचाराचा मास्टर माईंड भाजप?
अमरावती हिंसाचाराचा मास्टर माईंड भाजप?;
अमरावती बंद दरम्यान भाजपाच्या वतीने तोडफोड, जाळपोळ तसेच पोलिसांना मारहाण केल्याने अमरावतीत आज सकाळ पासून भाजप नेत्यांना अटक सत्र सुरू आहे. माजी पालकमंत्री अनिल बोंडे यांना अटक करण्यात आली होती. तसंच 'अमरावतीत बंद'मध्ये सहभागी झालेल्या भाजपाच्या 14 नेत्यांना आत्तापर्यंत पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
आत्तापर्यंत अमरावती दंगल प्रकरणात 70 लोकांना ताब्यात घेण्यात आलं असून 25 लोकांवर गुन्हा दाखल केला आहे.
अमरावतीमध्ये गेल्या तीन दिवसांपासून तणावपूर्ण शांतता असून काल व आज कुठल्याही प्रकारे गालबोट लागलं नाही. अशी माहिती अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली.
अमरावतीत संचारबंदी असल्याने नागरिकांना मूलभूत सुविधासाठी 2 ते 4 या वेळेला परवानगी देण्यात आली आहे. तसेच लवकरात लवकर परिस्थिती सामान्य होई.ल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. तर अमरावती मधील 4 ते 5 हजार पोलीस वगळता राज्य राखीव दल पोलीस बंदोबस्तसाठी तैनात असल्याचे देखील त्यांनी सांगितले तर दंगल करणाऱ्या कोणालाही सोडणार नाही. अशी माहिती यशोमती ठाकूर यांनी दिली आहे.
दरम्यान आज पोलिसांनी भाजप नेते अनिल बोंडे यांना अटक केली होती. अटक झाल्यानंतर हिंदू मार खाणार नाही. अशी प्रक्षोभक प्रतिक्रीया अनिल बोंडे यांनी दिली होती. अमरावतीतील हिंसा पूर्वनियोजन असल्याचं पोलिसांच्या तपासात निष्पण्ण झाले आहे, महाराष्ट्रात मोठी अशांतता माजवण्याचा डाव असल्याचं पोलीस सूत्रांचं म्हणणं आहे.
अटक झाल्यानंतर हिंदू मार खाणार नाही अशी प्रक्षोभक प्रतिक्रीया अनिल बोंडे यांनी दिली होती.
अमरावती हिंसा पूर्व नियोजीत?
अमरावतीतील हिंसा पूर्वनियोजन असल्याचं पोलिसांच्या तपासात निष्पण्ण झाले आहे, महाराष्ट्रात मोठी अशांतता माजवण्याचा डाव असल्याचं पोलीस सूत्रांचं म्हणणं आहे. या हिंसाचाराची तयारी आधीच करण्यात आली होती.
शुक्रवारची हिंसा आणि त्याला प्रत्युत्तरासाठी अल्पावधीत झालेली तयारी या दोन्ही गोष्टी उत्स्फूर्त नव्हत्या. असं प्रथम दर्शनी दिसून येत असल्याचं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. मोर्चाच्या वेळी जाणीवपूर्वक आधी सीसीटीव्ही कॅमेरे तोडण्यात आले. या सर्व गोष्टींचा सायबर पोलीस ही तपास करत आहेत.
अनिल बोंडे यांनी मोर्चा काढल्यानंतर ते शहरातील शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीकोनातूv काहीही प्रयत्न न करता आपल्या घरात दडून बसले होते. अखेरीस आज अमरावती पोलीसांनी त्यांना त्यांच्या घरातून अटक केली. त्यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.