सामना च्या भाषेवरून चंद्रकांत पाटलांचं रश्मी ठाकरेंना पत्र....
वहिनी, एक व्यक्ती म्हणून आपणाला चांगलं ओळखतो. सामनाच्या भाषेवरून चंद्रकांत पाटील यांचं थेट रश्मी ठाकरेंना पत्र...;
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सामनाच्या संपादक रश्मी ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रामध्ये दैनिक सामनामध्ये भाजपाबद्दल वापरण्यात येणाऱ्या भाषेचा संपादक म्हणून आपण विचार करावा. असा सल्ला चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून भाजपवर वारंवार शेलक्या शब्दात निशाणा साधला जातो. त्यातच शिवसेना नेत्यांना आलेल्या ईडीच्या नोटीसमुळे शिवसेना नेते आणि भाजपच्या नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगला आहे. त्यामुळं चंद्रकांत पाटील यांनी थेट रश्मी ठाकरे यांना पत्र लिहून...
''वहिनी आपणाला या पत्राद्वारे मी एवढेच सांगू इच्छितो की, आपण सामना वृत्तपत्राच्या संपादक आहात, वृत्तपत्रात छापण्यात येणाऱ्या बातम्या, त्यातील भाषा या सर्वांसाठी आपण संपादक म्हणून जबाबदार असता. वहिनी मी आपणाला एक व्यक्ती म्हणून चांगलं ओळखतो आणि मला खात्री आहे की, आपणालाही ही भाषा आवडत नसेल...''
असं म्हणत सामनाच्या भाषेबाबत तक्रार केली आहे.
दरम्यान हे पत्र लिहिण्यापुर्वीच संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांची खिल्ली उडवली आहे.
'बापरे, चंद्रकांतदादा पत्रं लिहिणार आहेत. याची मला भीती वाटतेय, त्यांनी तात्काळ पत्रं लिहावं,'
काय म्हटलंय पत्रात?
नमस्कार रश्मी वहिनी!
आज आपणास पत्र लिहिण्याचे कारण म्हणजे गेल्या काही दिवसांपासून आपल्या सामना वृत्तपत्रातून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय नेते तसेच भाजपा महाराष्ट्रातील नेत्यांबद्दल वापरण्यात येणारी खालच्या स्तराची भाषा!
वहिनी आपणाला या पत्राद्वारे मी एवढेच सांगू इच्छितो की, आपण सामना वृत्तपत्राच्या संपादक आहात, वृत्तपत्रात छापण्यात येणाऱ्या बातम्या, त्यातील भाषा या सर्वांसाठी आपण संपादक म्हणून जबाबदार असता. वहिनी मी आपणाला एक व्यक्ती म्हणून चांगलं ओळखतो आणि मला खात्री आहे की, आपणालाही ही भाषा आवडत नसेल.
चंद्रकांत पाटील यांनी हे पत्र सामना ऑनलाईन, ऑफिस ऑफ उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना ट्विटरवर टॅग केले आहे.
चंद्रकांत पाटलांच्या या पत्राला शिवसेना नक्की काय उत्तर देणार? हे पाहणं महत्त्वाचं आहे.