राज ठाकरे आणि चंद्रकांत पाटील भेट, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

Update: 2021-07-18 14:49 GMT

तिकडे दिल्लीत संसदेच्या अधिवेशनासंदर्भात बैठकावर बैठका सुरु आहेत. तर इकडे राज्यातही आगामी महापालिकेच्या दृष्टीकोनातून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मनसे आणि भाजपच्या युतीबाबत सातत्याने राज ठाकरे यांच्या परप्रांतीयांच्या मुद्द्यावर भाष्य करणाऱ्या चंद्रकांत पाटील यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील तीन दिवसांपासून नाशिकच्या दौऱ्यावर होते. दोनही नेते नाशिकच्या शासकीय विश्रामगृहातच मुक्कामी असताना या नेत्यांची भेट होईल का? अशी चर्चा सुरु होती. त्या दरम्यान राज ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांच्यात आज भेट झाली.

या भेटीत नाशिक महानगरपालिकेत दोनही पक्षांची युती होण्याची शक्यता आहे. फक्त नाशिकच नाही तर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजप आणि मनसे एकत्र आली तर महाविकास आघाडी समोर मोठं आव्हान निर्माण करु शकतात. ही बाब लक्षात घेता या उभय नेत्यांच्या भेटीला महत्त्व प्राप्त होते.

दरम्यान 10 ते 15 मिनिटं झालेल्या या भेटीत आमची जुनी मैत्री आहे. असं मत चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केलं आहे.

Tags:    

Similar News