कॉंग्रेसमधून भाजपवासी झालेल्या अमरीशभाईंची कॉंग्रेसवरच मात

धळे-नंदुरबार विधान परिषद पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे मत भाजपला अमरीशभाई पटेल यांना मिळून ते विजयी झाले आहेत. १ डिसेंबरला या विभागात ९९ टक्के मतदान झाले होते. त्यानंतर आज मतमोजणी अंती भाजपाच्या उमेदवाराने काँग्रेसच्या उमेदवाराला मात दिल्याचे स्पष्ट झाले.

Update: 2020-12-03 11:16 GMT

भाजपचे अमरीशभाई पटेल यांना 332 मत ,तर महाविकास आघाडीचे अभिजित पाटील यांना फक्त 98 मत पडली, 4 मत बाद झालीत. अमरिश पटेल यांनी विरोधकांची ११५ मते फोडण्यात यश मिळवले. या निवडणुकीसाठी भाजपाच्या १९९ तर महाविकास आघाडीच्या २१३ सदस्यांनी मतदान केले होते. त्यात महाविकास आघाडीच्या आणि विशेषत: काँग्रेसच्या ५०हून अधिक मतदारांनी क्रॉस व्होटिंग केले असल्याचे दिसून येत आहे.

सत्ताधारी महाविकास आघाडी मधील शिवसेना , राष्ट्रवादी काँग्रेस , आणि काँग्रेस या पक्षातील कोणी कोणी भाजपला मदत केली याची आता जोरदार चर्चा आहे.भाजपने या निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये मोठं भगदाड पाडलं आहे. काँग्रेसकडे आपला महाविकास आघाडी उमेदवार निवडून आणण्यासाठी संख्याबळ फक्त 98 मत पडली तर भाजपला 332 मत पडली. मुळचे कॉंग्रेसवासी असलेले अमरीशभाई पटेल यांनी सर्व ताकद पणाला लावून महाविकास आघाडीची मतं फोडल्याची चर्चा आहे.

पक्ष बलाबल -

महाविकास आघाडी - एकूण 213

काँग्रेस- 157

राष्ट्रवादी - 36

शिवसेना - 20

भाजप - एकूण 199

अपक्ष- 10

MIM - 9

समाजवादी पार्टी- 4

मनसे-1

बसपा-१


Full View
Tags:    

Similar News