भाजपचे होळी- धुलिवंदन निर्बंधावरुन पुन्हा राजकारण
महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंचे सरकार आहे की मुस्लिम लीगचे? राज्यात रोज नव्या कोरोना रुग्णवाढीचा उच्चाक गाठला जात असताना आज रात्रीपासून रात्रीची संचारबंदी लागू होणार आहे. कोरोना वाढू नये म्हणुन होळी आणि धुलिवंदन साजरा करण्याचे निर्बंध असताना भाजपचे आमदार अतुल भातखळर यांनी महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंचे सरकार आहे की मुस्लिम लीगचे? असा सवाल उपस्थित केला आहे.;
राज्यात दुसऱ्या कोरोना लाटेचा उद्रेक झाल्यानंतर राज्य सरकारने रात्रीची संचारबंदी लागू करुन होळी आणि धूलिवंदन साजरी करण्यासाठी नियमावली जारी केली आहे. सार्वजनिक ठिकाणी सण साजरा करण्यावर सरकारने निर्बंध घातले असून, त्याविरोधात भाजपाने पुन्हा आक्रमक पवित्रा घेतला आहे.
संसर्ग रोखण्यासाठी होळीनिमित्त नागरिक एकत्र येण्याच्या शक्यतेनं शहरांत सर्वत्र पोलिसांकडून बंदोबस्त ठेवला जाणार आहे. शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी, गस्त ठेवली जाणार असून, आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. सार्वजनिक ठिकाणी होळी साजरी करू नये यासाठी पोलिसांनीही नागरिकांना सूचना दिल्या आहेत. होळी आणि धूलिवंदन हा सण सार्वजनिकरीत्या साजरा करण्यास मनाई केली आहे.
गतवर्षी लॉकडाऊन नंतर मिशिन बिगेन अंतर्गत सर्व धार्मिक स्थळं बंद असताना टप्प्याटप्प्याने खुलं केल्यानंतर भाजपनं मंदीरं उघडण्यासाठी घंटानाद करत ठिकठिकाणी राज्यव्यापी आंदोलन केलं होतं.
आता होळी- धुलिवंदनचा मुद्दा उपस्थित करत ठाकरे सरकारच्या भूमिकेवर टीका करताना भाजपा नेत्यांनी 'शिवसेनेचा फतवा धाब्यावर बसवा, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून होळी साजरी करा', असं आवाहन केलं आहे. त्यामुळे होळी आणि धूलिवंदनाच्या सणावरून पुनश्च एकदा भाजपा-शिवसेना आमने-सामने आली आहे.
महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंचे सरकार आहे की मुस्लिम लीगचे? शब्बे बारातला परवानगी देऊन ठाकरे सरकारने होळीवर बंदी घातली आहे. हा हिंदूविरोध खपवून घेणार नाही. हिंदूनो जनाब सेनेचा फतवा धाब्यावर बसवा,सोशल डिस्टसिंगचे नियम पाळून होळी दणक्यात साजरी करा. चिल्लर औरंगजेबी मानसिकतेचा धिक्कार. pic.twitter.com/WVDfdCJORw
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) March 28, 2021
भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंचे सरकार आहे की मुस्लिम लीगचे? शब्बे बारातला परवानगी देऊन ठाकरे सरकारने होळीवर बंदी घातली आहे. हा हिंदूविरोध खपवून घेणार नाही. हिंदूनो जनाब सेनेचा फतवा धाब्यावर बसवा,सोशल डिस्टसिंगचे नियम पाळून होळी दणक्यात साजरी करा. चिल्लर औरंगजेबी मानसिकतेचा धिक्कार असं म्हटलं आहे.
भाजपचे दुसरे आमदार राम कदम यांनी महाविकास आघाडीवर टिका करत घरात होळी पेटवायची का? असा प्रश्न उपस्थित केला आहे.
हिंदू विरोधी #ठाकरेसरकार म्हणतेय #होळी घराच्या दारा समोर पेटवायची नाही.
— Ram Kadam - राम कदम (@ramkadam) March 28, 2021
तर मग काय घरात पेटवायची ?
लोक #रंगपंचमी समजू शकतात गर्दी होईल. एकमेकांना स्पर्श होईल मात्र नियमांचे पालन करत #होळी पेटवली .आणी
हिंदू बांधवांनी आपला सण साजरा केला तर त्याला ठाकरे सरकारचा विरोध का? pic.twitter.com/1mq7PVv1kN
"हिंदू विरोधी ठाकरे सरकार म्हणतंय होळी घराच्या दारासमोर पेटवायची नाही. तर मग काय घरात पेटवायची? लोक रंगपंचमी समजू शकतात गर्दी होईल. एकमेकांना स्पर्श होईल मात्र नियमांचं पालन करत होळी पेटवली आणि हिंदू बांधवांनी आपला सण साजरा केला, तर त्याला ठाकरे सरकारचा विरोध का? अन्य धर्मांना तातडीनं परवानगी दिली जाते ते काय कोविडचे नातेवाईक लागतात की वसुली सरकारचे?," अशी टीका भाजपाचे आमदार राम कदम यांनी केली आहे.
देशात गेल्या एक दिवसात आणखी ६२,२५८ जणांना करोनाचा संसर्ग झाला. हा या वर्षीचा एका दिवसातील रुग्णसख्येचा उच्चांक आहे. देशभर देशातील करोनाबाधितांची संख्या आता एक कोटी १९, ८,९१० वर पोहोचली. देशात गेल्या २४ तासांत करोनाने २९१ जणांचा मृत्यू झाला आहे. तर राज्यात काल दिवसभरात ३५,७२६ नवे रुग्ण आढळले असून, करोनामुळे १६६ जणांचा मृत्यू झाला. गेल्या २४ तासात मुंबई ६१३०, नाशिक २४२२, पुणे शहर ३५२२, पिंपरी-चिंचवड १६८७, उर्वरित पुणे जिल्हा १३८२, नांदेड शहर ७०२, नागपूर शहर २६७५, उर्वरित नागपूररु जिल्हा १०६६, जळगाव १०७२, पनवेल ४४८, ठाणे शहर ९३९, कल्याण-डोंबिवली ८५९ नवे रुग्ण आढळले.