विधानपरीषद निवडणुकीत भाजपचा झेंडा : महाविकास आघाडीला अपयश
विधीमंडळाचं आधिवेशन तोंडावर असताना विधानपरीषदेच्या नागपूर आणि अकोला मतदारसंघातून भाजपचे दोन्ही उमेदवार विजयी झाले आहेत.;
अकोल्यामधून भाजपचे वसंत खंडेलवाल तर नागपूरमधून चंद्रशेखर बावनकुळेंनी मोठ्या मताधिक्यानं बाजी मारली आहे.महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक मतमोजणीत ५४९ मते वैध ठरली. विजयी उमेदवारासाठी २७५ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला. पहिल्या मतांच्या मोजणीमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांना ३६२, रवींद्र भोयर यांना १, मंगेश देशमुख यांना १८६ मतं मिळाली.
अकोलामध्ये भाजपचे वसंत खंडेलवाल हे विजयी झाले असून अकोल्याची जागा शिवसेनेचे तीन टर्म उमेदवार गोपीकिशन बजोरीया यांना हरवत भाजपने जिंकली आहे. मागील विधानसभेत तिकीट नाकारलेले चंद्रशेखर बावनकुळे यांचे पुर्नवसन विधानपरीषदेचे तिकीट देऊन करण्यात आलं होतं.
अत्यंत नाट्यमय ठरलेल्या या विधान परिषदेच्या नागपूर येथील या जागेवरच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. काही तासांपूर्वी काँग्रेसने आपल्या उमेदवाराला सोडून अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला. त्यामुळे काँग्रेसने शेवटच्या क्षणाला आपलं आपला निर्णय बदलल्यामुळे निवडणुकीमध्ये चुरस वाढली होती.
भारतीय जनता पक्षाचे उमेदवार वसंत खंडेलवाल हे ४४३ मते घेऊन विजय झालेले आहेत. तर शिवसेनेचे तथा महाविकास आघाडीचे उमेदवार गोपीकिशन बाजोरिया हे चौथ्यांदा या निवडणुकीत उभे होते. मात्र, ते विजयाचा चौकार मारू शकले नाही. जवळपास १०९ मतांनी ते या निवडणुकीमध्ये पराभूत झाले. भाजपचे उमेदवार वसंत खंडेलवाल यांनी त्यांना पराभूत केले आहे. अंतर्गत गटबाजी आणि महाविकास आघाडीचे मते फुटल्याने भाजपचे उमेदवार हे निवडून आले आहे. तर वंचितने भाजपला केलेली मदत यामुळे ही हा विजय भाजपला खेचता आल्याचे विश्लेषकांचे म्हणने आहे. बाद मतांची संख्या ३१ आहे.